ठाणे जिल्ह्यात सनातन संस्था आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात पार पडला !

ठाणे, १५ जुलै (वार्ता.) – जिल्ह्यात ठाणे येथे २ ठिकाणी, तसेच डोंबिवली आणि अंबरनाथ येथे प्रत्येकी एक असे सनातन संस्थेच्या वतीने गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचा लाभ ५०० हून अधिक जिज्ञासू आणि साधक यांनी घेतला. अंबरनाथ येथे गुणवंत विद्यार्थिनी कु. साक्षी वीरेश अहिर हिचा सत्कार करण्यात आला. हिंदुत्वनिष्ठ श्री. मनोज सुर्वे आणि श्री. प्रदीप नवार अन् दैनिक ‘सनातन प्रभात’चे काही वितरक यांचा सत्कार करण्यात आला. ठाणे येथे ‘पुराणिक बांधकाम व्यवसाय’ आस्थापनाचे रवींद्र पुराणिक आणि पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई आदी मान्यवरांची सोहळ्याला उपस्थिती लाभली. ठाणे येथे सनातन संस्थेच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

 

गुरुपौर्णिमा महोत्सवात मान्यवरांनी केलेले मार्गदर्शन

तरुण पिढीला तारण्यासाठी अध्यात्माविना पर्याय नाही ! – अधिवक्ता घनश्याम उपाध्याय, अध्यक्ष, लॉयर्स फॉर जस्टिस सोसायटी

राष्ट्राची युवा पिढी राष्ट्राच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. ज्या राष्ट्रातील तरुणांना राष्ट्र, धर्म आणि परंपरा यांच्याविषयी ज्ञान नसते, ते राष्ट्र संपून जाण्याच्या मार्गावर असते. मागील काही वर्षांत तरुण पिढीमध्ये या गोष्टींचे पतन होतांना दिसते. हे आपले दुर्दैव आहे. या सर्व गोष्टींतून तरुण पिढीला तारायचे असेल, तर अध्यात्माविना पर्याय नाही. पूर्वी गुरुकुल शिक्षणपद्धत होती. त्यामध्ये धर्माविषयी शिकवले जायचे; मात्र आज युवा पिढी यंत्रवत होत आहे. सगळ्यांचा कल आधुनिक वैद्य किंवा अभियंता होण्याकडे आहे. राष्ट्रासाठी कार्य करणारे अल्प होत आहेत; मात्र सनातन संस्थेसारख्या संस्था कार्य करत असल्यामुळे देशाचा उद्धार होणार, यात शंका नाही.

हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून केले जाणारे धर्मांधांचे षड्यंत्र हाणून पाडा ! – दीप्तेश पाटील, हिंदु गोवंश रक्षा समिती

आज भारतात हिंदूंची परिस्थिती कशी झाली आहे, हे आपण पहात आहोत. कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे यांच्या हत्या म्हणजे हिंदूंचे बळी घेतले जात असल्याची ताजी उदाहरणे आहेत. बळी हा बकर्‍याचा घेतला जातो, वाघाचा नाही. त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला वाघ म्हणूनच जगावे लागेल. तसे झाल्यासच अशा घटना थांबतील. हिंदूंच्या विरुद्ध पुकारलेला जिहाद हा आता मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. याचे उदाहरण म्हणजे हलाल प्रमाणपत्र ! आवश्यकता नसतांनाही आज मोठ्या प्रमाणात नामांकित आस्थापनांच्या वस्तूंचे ‘हलाल सर्टिफिकेशन’ केलेले असते. या माध्यमातून चालू असणारे हलाल अर्थव्यवस्थेचे धर्मांधांचे षड्यंत्र आपण हाणून पाडायला हवे. हलाल प्रमाणित वस्तू विकत घेणे प्रत्येकाने टाळावे.

जेव्हा आपले अंत:करण शुद्ध होईल, तेव्हाच देवाची कृपा होईल ! – अधिवक्त्या विना थडानी, अध्यक्षा, सेंट्रल चिन्मय मिशन

सध्याच्या काळात नामस्मरण ही सर्वश्रेष्ठ साधना आहे. त्यामुळे आपण सतत नामजप करायला हवा. आपल्याला प्रत्येक क्षणी देवाची जाणीव व्हायला हवी. आपण सतत नामस्मरण केल्याने आपले अंतर्मन शुद्ध होते आणि आपल्यातील अवगुण दूर होतात. जेव्हा आपले अंत:करण शुद्ध होईल, तेव्हाच देवाची कृपा होईल. यासाठी आपण साधना करायला हवी.

स्वतःतील वैशिष्ट्यांचा सदुपयोग राष्ट्र, धर्म आणि ईश्वरी कार्य यांसाठी करणे ही साधना ! – दुर्गेश परुळकर, लेखक आणि व्याख्याते

प्रगतीचा खरा अर्थ अनेकांना समजलेला नाही. शाळेत मिळते, ते प्रगतीपुस्तक; पण तो विकास नव्हे. सृष्टी हा सर्वांत मोठा गुरु असतो. सृष्टी न सांगता आपल्याला सर्व काही शिकवत असते. आपल्यातील उद्यम, साहस, धैर्य, बुद्धी, पराक्रम आणि ज्ञान यांचा योग्य-अयोग्य दोन्ही प्रकारे वापर केला जाऊ शकतो; मात्र या वैशिष्ट्यांचा सदुपयोग राष्ट्र, धर्म आणि ईश्वरी कार्य यांसाठी करणे ही साधना आहे.

Leave a Comment