परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ याविषयी प्रवचन !

चिकित्सालयात ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ याविषयी मार्गदर्शन करतांना आधुनिक वैद्य (डॉ.) मानसिंग शिंदे

कोल्हापूर – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्वचारोगतज्ञ आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे यांच्या चिकित्सालयात ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन घेण्यात आले. प्रारंभी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या माध्यमातून चालू असलेले संशोधन कार्य ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून दाखवण्यात आले. यानंतर आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे यांनी मनुष्यजन्माचे ध्येय, सुख-दु:ख यांची कारणे, कुलदेवी-दत्त यांच्या नामजपाचे महत्त्व यांसह आध्यात्मिक उपायांचे महत्त्व यांची माहिती उपस्थितांना दिली. याचा लाभ ३५ औषधे विक्रेते आणि ५ महिला यांनी घेतला. प्रवचन झाल्यावर अनेकांनी शंकानिरसन करून घेतले. अनेकांनी ‘हा विषय प्रत्येक मासात आम्हाला सांगा’, असे मत व्यक्त केले.

Leave a Comment