एकमेवाद्वितीय हिंदु धर्म

समाजातील प्रत्येक घटकाच्या
आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने विचार करणारा हिंदु धर्म !

केवळ हिंदु धर्मातच प्रत्येक व्यक्‍तीला त्याच्या प्रकृतीनुरूप साधना करण्याची मोकळीक अन् सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हिंदु धर्माच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी हेही एक वैशिष्ट्य आहे. सनातन संस्था हिंदु धर्माच्या या गाभ्याच्या अनुषंगानेच ‘गुरुकृपायोगा’नुसार साधना करण्यास शिकवत आहे. यासाठी हिंदु धर्माच्या या पैलूची येथे थोडक्यात ओळख करून देत आहोत.

 

१. ‘व्यक्‍ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’

‘गुरुकृपायोगानुसार करावयाच्या साधनेचा एकच सिद्धांत आहे आणि तो म्हणजे ‘व्यक्‍ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’ पृथ्वीवरची लोकसंख्या सहाशे कोटीहून अधिक आहे; म्हणून ईश्‍वरप्राप्तीचे सहाशे कोटीहून अधिक मार्ग आहेत. सहाशेहून अधिक कोटीतील कोणतीही दोन माणसे एकसारखी नसतात. प्रत्येकाचे शरीर, मन, आवडी-निवडी, गुणदोष, आशाआकांक्षा, वासना सगळे निराळे आहे; प्रत्येकाची बुद्धी निराळी आहे; संचित, प्रारब्ध निराळे आहे; प्रत्येकातील पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही तत्त्वे (मनुष्य या पंचतत्त्वांपासून बनला आहे.) अन् सत्त्व, रज आणि तम हे त्रिगुण यांचे प्रमाण निरनिराळे आहे. थोडक्यात प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकृतीचा आणि पात्रतेचा असल्याने ईश्‍वरप्राप्तीचे साधनामार्गही अनेक आहेत. आपली प्रकृती आणि पात्रता यांना अनुरूप अशी साधना केल्यास ईश्‍वरप्राप्ती लवकर होण्यास साहाय्य होते. सनातन संस्थेचे सहस्रो साधक गुरुकृपायोगाच्या एकाच छत्राखाली आपापली निरनिराळी साधना करत आहेत.

याउलट सांप्रदायिक आणि विविध पंथांतील साधना सर्वांसाठी एकच असते.

 

२. प्राणीमात्रांच्या उन्नतीचाही विचार

समाज आणि व्यक्‍ती अशा दोन्ही संदर्भातील

१. जगतः स्थितिकारणं प्राणिनां साक्षात् अभ्युदयनिःश्रेयस हेतुर्यः स धर्मः । – श्री शंकराचार्य

अर्थ : समाजव्यवस्था उत्तम रहाणे, प्रत्येक प्राणीमात्राची ऐहिक उन्नती म्हणजे अभ्युदय होणे आणि पारलौकिक उन्नतीही होणे, या तीन गोष्टी साध्य करणार्‍यास धर्म म्हणतात.

२. ‘धर्मशास्त्रकारांच्या मताप्रमाणे ‘धर्म’ या नात्याने शब्दाची व्याप्ती एक उपासनेचा पंथ एवढीच नसून, त्या शब्दात प्रत्येक मनुष्याने व्यक्‍ती या नात्याने व्यक्‍तीचा (स्वतःचा) विकास करण्याकरिता आणि समाजाचा एक घटक या नात्याने मानवी समाजाचा विकास करण्याकरिता करावयाच्या कृत्यांचा आणि पाळावयाच्या निर्बंधांचा समावेश होतो.’

याउलट इतर पंथ केवळ आपल्या पंथियांचाच विचार करतात आणि इतर पंथियांचा द्वेष करतात !

 

३. ईश्‍वराच्या केवळ निर्गुण नाही, तर निर्गुण-सगुण,
सगुण-निर्गुण आणि सगुण रूपांचीही माहिती असणे

हिंदु धर्म ईश्‍वराच्या निर्गुण-सगुण आणि सगुण रूपांचीही माहिती देतो अन् ‘सगुण-निर्गुण नाही भेदाभेद’, या प.पू. भक्‍तराज महाराज यांच्या वचनाची अनुभूती देतो.

३ अ. निर्गुण-सगुण रूप

निर्गुण-सगुण रूप म्हणजे विविध देवता ! त्या बहुधा निर्गुण स्वरूपात असतात; मात्र आवश्यक तेव्हा सगुण रूपात येतात, उदा. विष्णु, गणपति, दत्त इत्यादी उच्च देवता; अग्नीदेव, वरुणदेव इत्यादी मध्यम देवता आणि स्थानदेवता, वास्तूदेवता इत्यादी कनिष्ठ देवता.

३ आ. सगुण-निर्गुण रूप

अवतार या स्वरूपात असतात. नीतीधर्माचा उच्छेद करणार्‍या आणि भूमीला भारभूत झालेल्या रावण, कंस आदी दैत्यांच्या निर्दालनासाठी भगवंताने अनुक्रमे राम आणि कृष्ण यांच्या रूपात अवतार घेतले.

३ इ. सगुण रूप

संत हे ईश्‍वराचे सगुण रूप असतात. विश्‍वाच्या कल्याणासाठी ते देह झिजवत असतात. मनुष्य प्राण्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ते मार्गदर्शन करतात आणि प्रत्येकाला मोक्षाचा मार्ग मोकळा करून देतात. व्यष्टी आणि समष्टी या दोन्ही स्तरांवर त्यांच्याकडून मिळणार्‍या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन मनुष्य आध्यात्मिक प्रगती करून घेऊ शकतो.

इतर पंथियांना ईश्‍वराच्या केवळ निर्गुण रूपाची थोडीफार कल्पना असते.

 

४. विविध साधनामार्ग

हिंदु धर्मात हठयोग, मौनयोग, त्राटक, प्राणायाम, ध्यानयोग, कुंडलिनीयोग, शक्‍तीपातयोग, कर्मयोग, ज्ञानयोग, नामसंकीर्तनयोग, भक्‍तीयोग इत्यादी अनेक परिपूर्णतेला गेलेले योगमार्ग आहेत. हेही हिंदु धर्माचे एक वैशिष्ट्य आहे.

याउलट इतर पंथियांना केवळ कर्मकांड थोडेफार ठाऊक असते.

४ अ. भक्‍तीमार्ग

‘हिंदु धर्मात नवविधा भक्‍ती सांगितली आहे – श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन, याउलट इतर पंथियांना केवळ दास्यभक्‍ती थोडीफार ठाऊक असते.’ – (प.पू.) डॉ. जयंती बाळाजी आठवले (सनातनचे प्रेरणास्थान)

Leave a Comment