शिशिर ऋतू

Article also available in :

दक्षिण भारतात थंडी जास्त पडत नसल्यामुळे शिशिरऋतु नसतो. शिशिरऋतूत आकाश निरभ्र आणि स्वच्छ असते; परंतु धुक्यामुळे सूर्य दर्शन फारसे होत नाही. थंड आणि कोरडा वारा वहातो. एकूण वातावरण अतिशय थंड आणि कोरडे असते. कधीकधी वादळी वार्‍यासह पाऊस पडतो. शिशिरऋतूत भूमी थंड असते. पाणी थंड, स्वच्छ आणि मधुर असते. औषधी उत्तम वीर्ययुक्त असतात आणि या ऋतूत कडू रसाचे अधिक्य असते. शरीरबल, पचनशक्ती आणि अग्नी उत्तम असतो.

 

१. शिशिर ऋतूत दोषांवर परिणाम

हा ऋतु कफ संचय काळ होय. शिशिरऋतूत उन्हात बसावे. थंडी असल्याने चांदण्या रात्रीत हिंडावे. थंड वार्‍यात किंवा बर्फात फिरू नये.

 

२. घर कसे असावे ?

उष्ण, उबदार घरात रहावे. स्वच्छ, उबदार लोकरीचे कपडे घालावेत. तसेच हातमोजे, पायमोजे, मफलर इत्यादी वापरावेत. झोपण्याची खोली उबदार असावी.

 

३. शिशिर ऋतूतील दिनचर्या

ब्राह्ममुहूर्तावर उठावे. तिखट कडू आणि तुरट रसात्मक दंतकाष्ठाने दंतघावन करावे. डोळ्यांत काजळ घालावे. उष्ण औषधी सिद्ध तेलाने गुळण्या कराव्यात. शैत्य निवारण्यासाठी औषधी वनस्पतींचे धूम्रपान करावे.

 

४. तांबूल

शिशिरऋतूत तांबूल सेवन करावे. अभ्यंग करावा. व्यायाम, पोहणे टाळावे, अतिश्रम करण्यास हरकत नाही. कोमट किंवा गरम पाण्याने स्नान करावे. त्यानंतर अगरुचूर्ण अंगास लावावे. दिवसा झोपू नये.

 

५. आहार

मधुर, आंबट आणि खारट रसात्मक अन् जड आहार घ्यावा. तिखट, कडू आणि तुरट रसात्मक पदार्थ अन् क्षार टाळावेत. तेल, तूप खाण्यास हरकत नाही.

 

६. पंचकर्म

स्नेहन, स्वेदन हेमंतऋतूप्रमाणे वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण, नस्य करू नये.

 

७. ऋतूनुसार कपड्यांचा रंग

ऋतू कपड्यांचा रंग
१. ‘ग्रीष्म (उन्हाळा) आणि शरद पांढरा. पांढरे कपडे सूर्यकिरण परावर्तित करतात; त्यामुळे शरीर थंड रहाते.
२. वर्षा (पावसाळा) पांढरा किंवा पिवळा
३. शिशिर आणि हेमंत (हिवाळा) लाल, पिवळा किंवा काळा.
४. वसंत लाल किंवा अन्य गडद रंग
सनातन-निर्मित ग्रंथ `आयुर्वेदानुसार दिनचर्येतील स्नानापासून झोपेपर्यंतच्या कृती आणि ऋतूचर्या`

Leave a Comment