मंगळुरू (कर्नाटक) येथील ‘युथ ऑफ जी.एस्.बी’ यू ट्यूब चॅनलवर सनातन संस्थेचा सहभाग

मंगळुरू (कर्नाटक) – आज हिंदू धर्मशिक्षणाच्या अभावामुळे धर्माचरणापासून दूर गेल्याचे लक्षात येते. धर्मनिरपेक्ष शासनपद्धतीमुळे आपल्या अभ्यासक्रमासह सर्वच स्तरांतून धर्माला काढण्यात आले. याचसमवेत देवस्थानांमध्येही धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था नसल्याने संपूर्ण हिंदू समाज याचे दुष्परिणाम भोगत आहे. आज युवा वर्गाला धर्माचरणाविषयी शंका असून त्यांना योग्य प्रकारे उत्तर देणारे कुणीही नाही. त्यामुळे नास्तिकवाद आणि पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण वाढत आहे. असे असले तरी अजूनही वेळ गेलेली नाही. उत्तरदायी नागरिक म्हणून आपण सर्वांनी जागरूक होऊन समाजाला धर्मशिक्षण देण्यासह योग्य दिशा देणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण सर्वांनी कृतीशील झाले पाहिजे, असे आवाहन सनातन संस्थेच्या सौ. लक्ष्मी पै यांनी केले. येथील ‘युथ ऑफ जी.एस्.बी’ यू ट्यूब चॅनेलवर नुकताच ‘धर्मो रक्षति रक्षितः’ या कोंकणी भाषेतील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात रा.स्व. संघाचे प्रबोधन संयोजक श्री. प्रकाश पै हेदेखील ‘अतिथी’ म्हणून सहभागी झाले होते. श्री. गोपालकृष्ण भट यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment