वर्तमानकाळात साधना करणे, हेच धर्माचरण ! – सौ. रिता पाठक, सनातन संस्था

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (काशी प्रांत)
विद्यार्थ्यांना सनातन संस्थेकडून ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे मार्गदर्शन

 

सुलतानपूर (उत्तरप्रदेश) – स्वामी विवेकानंद यांनी म्हटले होते की, धर्म, संस्कृती, भाषा, भूमी आणि जनता हे राष्ट्राचे ५ प्राण आहेत. यावरून आपण धर्मानुसार आचरण करणे आवश्यक आहे; परंतु सध्याच्या देशातील ‘सेक्युलर’ व्यवस्थेमुळे धर्माचा लोप झाला आहे. राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती पुष्कळ दयनीय झाली आहे. सद्यःस्थितीमध्ये साधना करणे, हेच धर्माचरण आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या सौ. रिता पाठक यांनी केले. सनातन संस्थेच्या वतीने ६ मे या दिवशी येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (काशी प्रांत) सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्यासाठी ‘वर्तमान भारतात धर्माचरणाची आवश्यकता’ या विषयावर ‘फेसबूक लाईव्ह’ च्या माध्यमातून मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. सुलतानपूर येथील अभाविपच्या सर्व कार्यकर्त्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

सौ. पाठक पुढे म्हणाल्या की, ‘प्रसिद्ध ब्रिटीश अर्थतज्ञ एंगस मेडिसन यांच्या म्हणण्यानुसार प्राचीन काळामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा वाटा ३२.९ टक्के इतका होता. आज आपली आर्थिक स्थिती पुष्कळ दयनीय झाली आहे आणि त्याचे मुख्य कारण राष्ट्रातून धर्माला दूर सारणे आहे. चाणक्य यांनी कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये लिहिले आहे की, सुख-समृद्धीचे मूळ धर्म आहे. त्यामुळे साधना करून आपण आध्यात्मिक बळ वाढवले पाहिजे.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment