भोर (जिल्हा पुणे) येथील हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या प्रबोधनामुळे लक्ष्मी-गौरीचे विडंबन रोखले

देवतांचे विडंबन रोखण्यासाठी कृतीशील झालेले हिंदुत्वनिष्ठ आणि चूक लक्षात आल्यावर कृतीत सुधारणा करणारे दुकानाचे मालक यांचे अभिनंदन ! सर्वत्रच्या हिंदूंनी यातून बोध घेऊन देवतांचे विडंबन रोखण्यासाठी कृतीशील व्हावे !

भोर (जिल्हा पुणे) – मंगळवार पेठेतील शारदा ड्रेसेस या तयार (रेडीमेड) कपड्यांच्या दुकानात गौरीपूजन या सणानिमित्त लक्ष्मी-गौरीचे मुखवटे आणि मूर्ती विक्रीस ठेवून त्या मूर्तींना प्रतिदिन आधुनिक प्रकारचे फ्रॉक्स, टॉप्स, मॅक्सी किंवा चुणीदार असे कपडे घालण्यात येत होते. हे लक्षात आल्यावर प्रखर धर्माभिमानी विनायककाका सणस, हिंदु जनजागृती समितीचे विश्‍वजित चव्हाण आणि सनातन संस्थेचे प्रा. विठ्ठल जाधव यांनी दुकानाचे मालक श्री. विनायक गुजर यांची भेट घेऊन लक्ष्मी-गौरीचे विडंबन होत असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले. देवी-देवतांची विटंबना केल्यास देवाची अवकृपा होते, याविषयी प्रबोधन केल्यावर श्री. गुजर यांना योग्य दृष्टीकोन लक्षात आला. त्यांनी लगेचच लक्ष्मी-गौरीला घातलेले आधुनिक कपडे काढून सात्त्विक साडी नेसवून ते विक्रीस ठेवण्याचे आश्‍वासन दिले. त्याप्रमाणे त्यांनी मूर्तीला घातलेले आधुनिक कपडे काढून ठेवल्याचे दिसून आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment