यज्ञाचा प्रथमावतार असलेल्या ‘अग्निहोत्रा’चे वैज्ञानिक संशोधन !

‘अग्निहोत्र केल्याचा वातावरणावर काय परिणाम होतो’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजण्यांच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

यू.टी.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत अग्नीहोत्र करण्यापूर्वी आणि अग्नीहोत्र केल्यानंतर अग्निहोत्र-पात्राच्या ‘यू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. या केलेल्या मोजण्यांच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

वाचकांना सूचना : जागेअभावी या लेखातील ‘यू.टी.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

 

२. केलेल्या मोजण्यांच्या नोंदी

२ अ. नकारात्मक ऊर्जा नसणे

अग्निहोत्र-पात्रामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही

२ आ. अग्निहोत्रानंतर अग्निहोत्र-पात्राच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ होणे

सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. अग्निहोत्र-पात्रामध्ये आरंभी अल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती; पण तिची प्रभावळ मोजता येईल इतपत नव्हती. (त्याच्या संदर्भात ‘यू.टी.’स्कॅनरच्या भुजांनी ९० अंशाचा कोन केला. स्कॅनरच्या भुजांनी १८० अंशाचा कोन केला, तरच प्रभावळ मोजता येते.) अग्निहोत्र केल्यानंतर अग्निहोत्र-पात्राच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली. तिची प्रभावळ १.७० मीटर आली.

२ इ. अग्निहोत्रानंतर अग्निहोत्र-पात्राच्या एकूण प्रभावळीत (टीप) पुष्कळ वाढ होणे

सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते.अग्निहोत्र आरंभ करण्यापूर्वी अग्निहोत्र-पात्राची एकूण प्रभावळ १.१९ मीटर होती. अग्निहोत्र केल्यानंतर अग्निहोत्र-पात्राच्या एकूण प्रभावळीत ३.०५ मीटर वाढ होऊन, ती ४.२४ मीटर आली.

टीप – एकूण प्रभावळ : व्यक्तीच्या संदर्भात तिची लाळ, तसेच वस्तूच्या संदर्भात तिच्यावरील धुलीकण किंवा तिचा थोडासा भाग यांचा ‘नमुना’ म्हणून उपयोग करून त्या व्यक्तीची वा वस्तूची ‘एकूण प्रभावळ’ मोजतात.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment