डॉ. प्रमोद मोघे यांनी केलेल्या अग्निहोत्राच्या प्रयोगांचे परिणाम

पुणे येथील डॉ. प्रमोद मोघे पुण्यातील नॅशनल केमिकल लेबॉरेटरी या संस्थेतील निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी अग्निहोत्राचे पुणे येथे प्रयोग केले. त्या प्रयोगाचे निष्कर्ष आणि परिणाम त्यांच्याच शब्दांत येथे मांडत आहोत.

 

१. अग्निहोत्राचे परिणाम

अग्निहोत्राचे परिणाम पहाण्यासाठी मुद्दाम आम्ही पर्यावरणग्रस्त भाग निवडला. जेथे हवेचे प्रदूषण प्रचंड प्रमाणावर आढळले. तो भाग म्हणजे रमणबाग हायस्कूल, शनिवार पेठ ! अग्निहोत्राचे परिणाम जाणून घेण्यासाठी खालील गोष्टींचे पूर्वमापन करण्यात आले. ते म्हणजे परिसरातील हवेचे विश्‍लेषण अग्निहोत्र प्रयोगांचे खालील उद्दिष्ट्ये ठरवण्यात आली. ती अशी –

अ. अग्निहोत्रामुळे होणारे प्रकाश आणि उष्णता उर्जेतील पालट

आ. अग्निहोत्राच्या धुराचा सभोवतालच्या सूक्ष्म जंतूवर परिणाम

इ. अग्निहोत्राच्या धुराचा पर्यावरणातील हवेतील प्रदूषणावर होणारा परिणाम

ई. अग्निहोत्राचा धूर आणि राखेचे रोपे / बी-बियाणे वाढीवर परिणाम

उ. अग्निहोत्राच्या राखेचे औषधी गुणधर्म

ऊ. अग्निहोत्राची राख पाणी शुद्ध राखते

हे प्रयोग शाळेतील वर्गात करण्यात आले. त्यात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि शाळेचे मुख्याध्यापक यांनी मनापासून भाग घेऊनच उत्तम साथ दिली. तेथील प्रयोगाकरता फर्ग्युसन महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान विभागाच्या प्राचार्यांचे साहाय्य, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील प्रयोगशाळा आणि प्राध्यापकांचे साहाय्य माझ्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. आर्थिक साहाय्य प्रज्ञा विकास मंचाचे FROST या संस्थेने पुढाकार घेऊन केले. सर्व आधुनिक विज्ञानयंत्राद्वारे अग्निहोत्राचे खालील लाभ जगासमोर मांडण्यात यशस्वी ठरलो.

१. अ. ९० टक्के सूक्ष्मजंतूची वाढ थांबली !

अग्निहोत्रामुळे प्रकाश उर्जेतील पालट हा लक्ष मीटरच्या साहाय्याने मोजण्यात आला. अग्निहोत्राच्या धुराचे सभोवतालच्या सूक्ष्मजंतूवर होणारे परिणाम अभ्यासण्यासाठी यज्ञाच्या आधीच्या आणि नंतरच्या जंतूंची संख्या मोजण्यात आली. अग्निहोत्राने जवळजवळ ९० टक्के सूक्ष्मजंतूची वाढ थांबली असल्याचे सिद्ध झाले. प्रयोगासाठी निवडण्यात आलेली जागा रहदारीच्या गजबजलेल्या ठिकाणी असल्याने तेथे हवेचे प्रदूषण प्रचंड असल्याचे आढळले; पण अग्निहोत्र केल्यावर हवेतील घातक सल्फरडाय ऑक्साईडचे प्रमाण दहा पटींनी कमी झाल्याचे आढळून आले. त्यावरून प्रदूषण रोखण्यास अग्निहोत्र साहाय्य करत असल्याचे सिद्ध झाले.

१. आ. रोपांची वाढ जोमाने आणि मोठ्या प्रमाणात !

रोपांच्या वाढीसाठी अग्निहोत्राचे परिणाम तपासण्यासाठी मोड आलेल्या बिया अग्निहोत्र करण्याच्या खोलीत आणि शाळेच्या बाहेरच्या परिसरात ठेवण्यात आल्या. अग्निहोत्राच्या वातावरणात राख लावून ठेवलेल्या बियांच्या रोपांची वाढ जोमाने आणि मोठ्या प्रमाणात झाली. अग्निहोत्र परिसरात न ठेवलेल्या बियांपेक्षा ती वाढ अधिक प्रमाणात होती, हे आढळून आले. त्यामुळे शेतीला अग्निहोत्र विधी अत्यंत उपयुक्त आहे, हेही सिद्ध झाले.

१. इ. पाण्यातील जंतू आणि क्षारांचे प्रमाण ८० टक्के ते ९० टक्के कमी

अग्निहोत्राची राख जंतूनाशक असल्याचे आढळून आल्यामुळे जखमा, त्वचारोग यांवर ती अत्यंत उपयुक्त ठरते, हेही प्रयोगानिशी सिद्ध झाले. अग्निहोत्राच्या राखेमुळे पिण्याच्या पाण्यातील जंतू आणि क्षारांचे प्रमाण ८० टक्के ते ९० टक्के कमी झाल्याचे सर्वसामान्यपणे आढळून आल्यावर अग्निहोत्राचा पाणी शुद्धीकरणासाठीही उपयोग होतो, हे सिद्ध झाले.

वरील सर्व लाभ केवळ १० मिनिटांत मिळू शकतात. या विधीसाठी रुपये ३ ते ५ खर्च करून प्रत्येक घर प्रदूषणविरहित, जंतूविरहित, पिण्याच्या पाण्यासकट आपण करू शकतो. शेतीकरता त्या राखेचाही उपयोग करू शकतो, हे आम्ही जगासमोर सप्रमाण, निष्कर्ष काढून जागतिक वैज्ञानिक मासिकात ते प्रसिद्ध करू शकलो. आपल्या पूर्वपारंपरिक विज्ञानाला मानाचे स्थान जगात देऊ शकलो, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

 

२. ७० देशांकडून ‘अग्निहोत्र’ या भारतीय संकल्पनेचा स्वीकार

यापूर्वी मी पाणी शुद्धीकरणासाठी वेदांत वर्णन केलेल्या १५ वनस्पतींचा उपयोग करून पाणी अगदी Mineral Water इतके शुद्ध करून त्याची जागतिक पेटंट्स मिळवली आहेतच; पण त्याकरता सर्वांनीच आपल्याच ज्ञानावर बौध्दिक गुलामगिरी न बाळगता विश्‍वास ठेवणे अत्यावश्यक आहे. या अभ्यासादरम्यान जर्मनी, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, पोलंड, झेकोस्लोव्हाकिया, जपान, सिंगापूर, पेरू, इक्वाडोर, स्विर्त्झर्लंड, स्पेन, कॅनडा इ. ७० देशांनी अग्निहोत्र या भारतीय संकल्पनेचा स्वीकार केला आहे. त्यांनी विविध विज्ञान विषयक मासिकांत त्याचे निष्कर्ष प्रसिद्ध करणे चालू केले आहे. त्यांनी यावरील शेतीला Homa Farming Technique असे नावही दिले आहे.

 

३. हाती असलेल्या सोन्याची भारतियांना किंमत नाही !

दुर्दैवाने भारतीय प्राचीन विज्ञानाला अणूशास्त्र, रसायनशास्त्र, भैतिकशास्त्र, गणित, आरोग्यशास्त्र, वैमानिक शास्त्र, धातू शास्त्र, बांधकाम, शिल्पशास्त्र याचा पुरेपूर उपयोग वर विदित केलेल्या देशातील शास्त्रज्ञांनी करून घेवून त्याचीच जागतिक पेटंटस् नोंदवलेली, आपल्या झोपी गेलेल्या, शास्त्रज्ञांना आढळू लागली आहेत. प्राचीन विज्ञानावर अशा शास्त्रज्ञांचा विश्‍वास नव्हता; पण तेच ज्ञान गोर्‍या लेखणीतून बाहेर पडल्यावर धन्य, धन्य म्हणून ते स्वीकारणारे शास्त्रज्ञ पाहिल्यावर ‘हाती असलेल्या सोन्याची किंमतच न कळल्याने आपण कथलाचा वाळा हाती बाळगून आहोत’, असे खेदाने म्हणावे लागते.’

(संदर्भ : hindi.indiawaterportal.org)
अग्निहोत्र कसे करावे हे जाणून घेण्यासाठी पुढील लेख वाचा – अग्निहोत्राचे स्वरूप आणि प्रक्रिया

4 thoughts on “डॉ. प्रमोद मोघे यांनी केलेल्या अग्निहोत्राच्या प्रयोगांचे परिणाम”

 1. अग्निहोत्र विधी मी मागील 12 वर्षांपासून नियमित करत आहे, यामुळे मन शांत, स्थिर रहाण्यास मदत होते. आपली अध्यात्मिक उन्नती पण होते. असा माझा अनुभव आहे.

  Reply
  • नमस्कार,

   अग्निहाेत्राचे पात्र पूजासाहित्य विक्रीच्या कुठल्याही दुकानात मिळेल, अथवा online देखील मिळेल.

   Reply

Leave a Comment