संतमहंतांचे आशीर्वाद लाभले ।आम्हाला दैवी बळ मिळाले ।।

सनातन संस्थेने आरंभलेल्या धर्मकार्याला अनेक संतमहंतांचे माध्यमातून आशीर्वाद देऊन जणू ईश्वरानेच सनातन कार्याची पताका देशभरात फडकवली आहे.

अ. ‘सनातन संस्थे’विषयी संतांचे गौरवोद्गार !

१. निष्ठा, त्याग, सेवा आणि सदाचार यांमुळे सनातन संस्था व्यापक रूप धारण करील !

प.पू. रामानंद महाराज
(सद्गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी ) इंदूर, मध्यप्रदेश.
प.पू. रामानंद महाराज
(सद्गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी ) इंदूर, मध्यप्रदेश.

श्रीमद् सद्गुरु भक्तराज महाराज यांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने सनातन संस्थेच्या छोट्या रोपाचे रूपांतर एका विशाल वटवृक्षात झाले आहे. त्याचे एकच कारण आहे आणि ते म्हणजे सनातनच्या साधकांनी सर्वस्वाचा त्याग करून संस्थेचे कार्य निष्ठेने आणि प्रेमाने केले आणि करीत आहेत. सनातन संस्था दिवसेंदिवस व्यापक रूप धारण करील. फक्त निष्ठा, त्याग, सेवा आणि सदाचार या चार गोष्टींमुळेच हे साध्य होणार आहे, अशी माझी खात्री आहे. – प.पू. रामानंद महाराज (सद्गुरु प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी ) इंदूर, मध्यप्रदेश.

२. सनातन संस्था

जगद्गुरु श्री शंकराचार्य
स्वामी जयेंद्र सरस्वती, कांची कामकोटी पीठ
जगद्गुरु श्री शंकराचार्य
स्वामी जयेंद्र सरस्वती, कांची कामकोटी पीठ

प्रत्येक युगात देवासुर युद्ध होत असते. या युगात ‘सनातन संस्था’ ते युद्ध लढत आहे ! – जगद्गुरु श्री शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती, कांची कामकोटी पीठ

३. सनातनच्या कार्यासाठी दिलेला वेळ म्हणजे ईश्वरी कार्यास दिलेला वेळ !

जगद्गुरू श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज,
श्रीक्षेत्र नाणिज, जिल्हा रत्नागिरी
जगद्गुरू श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज,
श्रीक्षेत्र नाणिज, जिल्हा रत्नागिरी

अ. सनातनच्या आश्रमात येऊन प्राचीन काळातील गुरुकुलपद्धती बघायला मिळाली. प.पू. डॉ. आठवले यांनी साधकांमध्ये शिस्तबद्धता आणि स्वावलंबन रुजवले आहे, त्यामुळे फायदा होत आहे. सनातनच्या साधकांनी सनातनच्या कार्यासाठी दिलेला वेळ हा ईश्वरी कार्यास दिलेला वेळ आहे. त्यामुळे तो सार्थकी लागणार आहे !

आ. सनातन संस्थेने क्षात्रधर्म सांगितला आहे. समाजात क्षात्रवृत्ती वाढवल्यानेच हिंदूंची मुस्कटदाबी बंद होईल, हे डॉ. आठवले यांनी ओळखले. अशा साधु-संतांना परमेश्वरानेच पाठवले आहे.

– जगद्गुरू श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, श्रीक्षेत्र नाणिज, जिल्हा रत्नागिरी.

४. सनातन धर्माच्या रक्षणासाठीच सनातनची निर्मिती !

सनातन धर्मासाठी योगदान देणार्‍या ‘सनातन संस्थे’विषय आपण जाणून होतो. या संस्थेचे कार्य जवळून बघण्याची संधी मिळाली. संस्थेचे साधक धर्मरक्षणाचे कार्य विविध माध्यमांतून अत्यंत प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे करत आहेत. सनातन धर्माच्या रक्षणासाठीच सनातन संस्थेची निर्मिती झाली आहे. – जगद्गुरु शंकराचार्य प.पू. स्वामी श्री विद्याभिनव कृष्णानंदतीर्थ महास्वामीजी

५. जे शाश्वत आहे, तेच सनातन आहे

प.पू. आचार्य धर्मेंद्रजी महाराज
प.पू. आचार्य धर्मेंद्रजी महाराज

‘जे शाश्वत आहे, तेच सनातन आहे. प.पू. डॉ. आठवले यांनी संस्थेला ‘सनातन’ म्हणून दिलेले नाव, हे शाश्वत असल्याने ते योग्यच आहे ! – प.पू. आचार्य धर्मेंद्रजी महाराज

६. तरुणवर्गाला आध्यात्मिक मार्गाने नेण्याचे अलौकिक कार्य !

प.पू. दादाजी वैशंपायन,
कल्याण, जिल्हा ठाणे.
प.पू. दादाजी वैशंपायन,
कल्याण, जिल्हा ठाणे.

सदगुरु डॉ. जयंतराव (सनातन संस्थेचे प्रेरणास्थान प.पू. डॉ. जयंत आठवले) यांच्या खंबीर नेतृत्वाखाली सनातनचे चाललेले अतिशय शिस्तबद्ध असे हे कार्य खरोखरीच कौतुकास्पद आहे. विशेषतः तरुणवर्गाला आध्यात्मिक मार्गाने नेण्याचे अलौकिक कार्य प.पू. डॉक्टर करत आहेत. साधकांचे नम्र आणि शिस्तबद्ध वागणे आणि गुरुचरणी असलेली निष्ठा पाहून आनंद वाटतो.’ – प.पू. दादाजी वैशंपायन, कल्याण, जिल्हा ठाणे.

७. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

महायोगी गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी,
वडाळा महादेव, जिल्हा अहमदनगर.
महायोगी गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी,
वडाळा महादेव, जिल्हा अहमदनगर.

धर्मजागृतीचे पवित्र कार्य आठवलेंकडून (सनातन संस्थेचे प्रेरणास्थान) व्हावे, ही प्रभूची इच्छा आहे. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. चिंतेचे कारण नाही ! – महायोगी गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी, वडाळा महादेव, जिल्हा अहमदनगर.

आ. ‘सनातन संस्थे’च्या धर्मजागृतीच्या कार्याला संतांचे साहाय्य !

१. योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

सनातनच्या धर्मप्रसाराच्या कार्यातील अडथळे दूर करण्यासाठी ‘ॐ आनंदम् हिमालयम्’ या संप्रदायाचे संस्थापक योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन (कल्याण, जिल्हा ठाणे) यांनी आपल्या शिष्यांसह सनातनच्या आश्रमांत आणि इतरत्र पूजाअर्चा, जपजाप्यादी अनुष्ठाने, यज्ञयाग, तसेच जल-अनुष्ठाने केली आहेत.

२. महायोगी गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

सनातनच्या धर्मप्रसारकार्यातील अडथळे दूर करण्यासाठी गुरुदेवांनी वेळोवेळी जप, हवन, सप्तशतीपाठ इत्यादी केले, तसेच त्यांचे तेजस्वी लिखाण सनातनला सदासाठीच उपलब्ध करून दिले आहे.

Leave a Comment