धर्मापासून दूर गेलेल्या तरुण पिढीला धर्माच्या मार्गावर आणण्याचे कार्य सनातन संस्था करत आहे ! – शनि महाराज, सातारा

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या
कुंभनगरी येथील प्रदर्शनांविषयी संत-महंतांकडून कौतुकोद्गार !

शनि महाराज यांना पुष्पहार घालून आणि ग्रंथ भेट देऊन त्यांचा सन्मान करतांना पू. नीलेश सिंगबाळ

प्रयागराज (कुंभनगरी), ६ फेब्रुवारी (वार्ता.) – धर्मापासून दूर गेलेल्या तरुण पिढीला धर्माच्या मार्गावर आणण्याचे मोठे कार्य सनातन संस्था करत आहे, असे प्रतिपादन सातारा-सोळशी येथील शनैश्‍वर देवस्थानचे शनि महाराज यांनी १ फेब्रुवारी या दिवशी कुंभनगरी येथे केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने येथे लावण्यात आलेले ग्रंथ आणि धर्मशिक्षण फलक यांच्या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांनी पुष्पहार घालून आणि ‘देवनदी गंगा की रक्षा करें !’ हा हिंदु जनजागृती समितीपुरस्कृत हिंदी ग्रंथ देऊन त्यांचा सन्मान केला. या प्रसंगी समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, तसेच समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक श्री. सुनील घनवट हे उपस्थित होते.

शनि महाराज पुढे म्हणाले, ‘‘सनातनचे कार्य हिंदु राष्ट्र निर्माण करण्याचे आहे. यामुळे युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण होत आहे. जिहादी लोक आपल्या मुलींना पळवून नेत आहेत, त्यांना प्रतिबंध करण्याचे काम सनातन करत आहे. ज्याप्रकारे शरिरात रक्तवाहिन्या असतात, तसे सनातनचे साधक हे भारताच्या रक्तवाहिन्या आहेत. साधकांनी ठरवले, तर ते सुदृढ हिंदुस्थान पुन्हा निर्माण करू शकतात, असा सनातनविषयी मला पूर्ण विश्‍वास आहे. त्यामुळे एक दिवस ‘अखंड हिंदु राष्ट्र’ निर्माण होईल, यासाठी मी त्यांना ‘शनि देवस्थान, सोळशी, सातारा’कडून शुभाशीर्वाद देतो.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment