सनातन संस्थेचे कार्य उत्कृष्ट आहे ! – श्री रमेशगिरी महाराज, जनार्दन आश्रम, कोपरगाव

कुंभमेळा प्रयागराज २०१९

श्री रमेशगिरी महाराज यांचा सन्मान करतांना पू. नीलेश सिंगबाळ

प्रयागराज (कुंभनगरी), ६ फेब्रुवारी (वार्ता.) –  सनातन संस्थेचे कार्य उत्कृष्ट आहे, हे प्रदर्शन पाहिल्यानंतर लक्षात येते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून हिंदूंमध्ये जागृती होईल, अशी मी अपेक्षा करतो, असे प्रतिपादन कोपरगाव (महाराष्ट्र) येथील जनार्दन आश्रमाचे श्री रमेशगिरी महाराज यांनी केले. कुंभनगरीत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ अन् धर्मशिक्षण फलक प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे उत्तर-पूर्व भारताचे मार्गदर्शक पू. नीलेश सिंगबाळ यांच्या हस्ते श्री रमेशगिरी महाराज यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर पू. नीलेश सिंगबाळ यांनी त्यांच्याशी राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याविषयी चर्चाही केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment