हिंदु धर्मासाठी त्याग, हाच सर्वांत मोठा त्याग होय ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

हिंदुत्वनिष्ठांना हिंदु राष्ट्राची झलक
अनुभवण्यास देणार्‍या आणि कुटुंबभावना निर्माण
करणार्‍या हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण कार्यशाळेचा समारोप

सांगली – येणारा काळ महाभयानक आपत्काळ घेऊन येणार आहे. अन्न, पाणी यांच्या तुटवड्यासह अनेक गोष्टींची वानवा असेल. या आपत्काळात वाचण्यासाठी साधना करणे अत्यावश्यक आहे. आता काळ अल्प असून समाजात जाऊन अधिकाधिक धर्मप्रसार करणे अत्यावश्यक आहे. धर्मप्रसार हीच सर्वोत्तम सेवा असून हिंदु धर्मासाठी त्याग हाच सर्वांत मोठा त्याग होय, असे मार्गदर्शन सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. त्या ९ डिसेंबर या दिवशी हरिदास भवन येथील हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण कार्यशाळेत समारोपीय सत्रात बोलत होत्या. या कार्यशाळेला ४७ धर्मप्रेमी उपस्थित होते. समारोपप्रसंगी श्री. राजाराम रेपाळ, आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे याही व्यासपिठावर उपस्थित होत्या. ‘वंदे मातरम’ने कार्यशाळेची सांगता करण्यात आली.

कार्यशाळेत सहभागी महिला हिंदुत्वनिष्ठ आणि सद्गुरु (कु.) स्वाती खाडये (१)
कार्यशाळेत सहभागी पुरुष हिंदुत्वनिष्ठ आणि सद्गुरु (कु.) स्वाती खाडये (१)

या वेळी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये म्हणाल्या, ‘‘लव्ह जिहाद, लँड जिहाद, धर्मांतर अशा अनेक समस्या हिंदूंसमोर ‘आ’वासून उभ्या आहेत. अन्य धर्मीय हे धर्माभिमानी असून धर्माचरण करतात, याउलट हिंदूंना धर्माचा अभ्यास नाही. क्रांतीकारकांनी स्वातंत्र्य मिळवले; मात्र त्याच स्वातंत्र्यांची आज दयनीय स्थिती झाली आहे. या सगळ्यावर हिंदु राष्ट्र हेच उत्तर असून त्यासाठी झोकून देऊन सेवा करण्याचा निर्धार धर्मनिष्ठांनी करावा.’’ कार्यशाळेत प्रत्यक्ष कृती-संपर्क कसा करावा, स्वभावदोष-अहं निर्मूलन कसे करावे आणि त्यांचा अभ्यास, कार्यकर्त्यांमध्ये कोणते गुण असावेत, दैनिक सनातन प्रभातचे महत्त्व, तसेच विविध विषयांवर हिंदुत्वनिष्ठांसाठी मार्गदर्शन आयोजन करण्यात आले. घेण्यात आलेल्या गटचर्चांमध्ये हिंदुत्वनिष्ठांनी कृतीशील सहभाग नोंदवला.

सहभागी धर्मप्रेमींचे भावस्पर्शी मनोगत

१. सौ. सुवर्णा माळी – मिळेल ती सेवा झोकून देऊन करेन. पुढाकार घेऊन प्रवचनांचे नियोजन करणे, प्रवचन घेऊन विविध विषय समाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीन.

२. सौ. अनुजा धर्मे – तन, मन ओतून हिंदु राष्ट्रासाठी कार्य करीन.

३. श्री. वैभव भोसले – सेवांच्या विविध अंगांविषयी सखोल माहिती मिळली. स्वभावदोष प्रक्रिया बारकाईने शिकता आली.

४. सौ. विजया बाबर, तुजारपूर, ईश्‍वरपूर – ईश्‍वरच मला इथे घेऊन आला. प्रारंभी मला बोलताही येत नसे, आता ते शिकले.

विशेष

१. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये म्हणाल्या, ‘‘धर्मप्रेमींनी त्यांच्या कुटुंबियांना साधनेत आणले हे कौतुकास्पद आहे. याचप्रकारे समाजात साधना करणार्‍यांच्या कुटुंबियांनीही साधना करण्यासाठी यापुढील काळात धर्मप्रेमींनी प्रवृत्त करावे.’’

२. समारोपप्रसंगी धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे ‘आम्ही सारे सनातन सनातन’, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’, यांसह अन्य घोषणा दिल्या.

३. कळत-नकळत झालेल्या चुकांविषयी आयोजकांनी क्षमायाचना केली. या वेळी काही शिबिरार्थिंनीही कान पकडून क्षमायाचना केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment