धर्मावरील विविध संकटांच्या विरोधात हिंदूंनी संघटित व्हायला हवे ! – श्री. दैवेश रेडकर, सनातन संस्था

ओरोस, सिंधुदुर्ग येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

दीपप्रज्वलन करतांना उजवीकडून श्री. सत्यविजय नाईक आणि श्री. दैवेश रेडकर

सिंधुदुर्ग – देशात आम्ही सेक्युलर (धर्मनिरपेक्ष) आहोत, असे गर्वाने सांगितले जाते; मात्र बहुसंख्य हिंदू असलेल्या या देशात सर्वांत प्रथम ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्या मतांचा, भावनांचा विचार केला जातो. या देशात हिंदूंसाठी कायदे आणि  अल्पसंख्यांकांसाठी फायदे, अशी स्थिती आहे. देशात हिंदूंना स्वाभिमानाने जगण्यासाठी हिंदु राष्ट्राशिवाय पर्याय नाही. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या या कार्यात सहभागी होऊन, हिंदु राष्ट्राचे केवळ साक्षीदार नव्हे, तर भागीदार व्हा !, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक यांनी येथे केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथील श्री देव रवळनाथ मंदिराच्या पटांगणात २ डिसेंबर या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेचा प्रारंभ श्री. सत्यविजय नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून आणि श्री. राजेंद्र परब यांनी शंखनाद केल्यानंतर झाला. या सभेला सद्गुरु  सत्यवान कदम यांची वंदनीय उपस्थिती लाभली होती.

या वेळी श्री. सत्यविजय नाईक पुढे म्हणाले, ही केवळ सभा नसून एक प्रकारचे धर्मयुद्धच आहे. या सभेतून आपल्याला हिंदु राष्ट्र स्थापनेचा संकल्प करायचा आहे. बहुसंख्य हिंदु असलेल्या या देशात मदरशांना मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते. आपण मोठ्या श्रद्धेने जो पैसा मंदिराच्या दानपेटीत टाकतो, तो पैसाही आज सेक्युलर होत आहे. शासन आज मोठ्या प्रमाणात मंदिरे कह्यात घेत आहे. आज धर्मांतराचे लोण प्रत्येक गावात येऊन ठेपले आहे. धर्मांतरित झालेले हिंदूच हिंदूंच्या विरोधात उभे रहात आहेत. असे धर्मांतर होऊ देणे म्हणजे आपण आपले शत्रू निर्माण करत असल्यासारखेच आहे. यासाठी आपल्या गावातील एकही हिंदू धर्मांतरित होणार नाही, यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प करूया.

सभेला उपस्थित धर्माभिमानी हिंदू

सनातन संस्थेचे श्री. दैवेश रेडकर हिंदु राष्ट्राची आवश्यकता या विषयावर म्हणाले, हिंदूंचे मिशनर्‍यांकडून धर्मांतर होण्यासह लव्ह जिहादचा धोकाही वाढला आहे. लव्ह जिहादला आज अनेक कुटुंबांतील तरुणी सहजपणे बळी पडत आहेत. धर्मावरील या विविध संकटांच्या विरोधात आम्ही संघटित झालो आहोत, असा संदेश आपण आपल्या या एकजुटीतून धर्मद्रोह्यांना देऊया.

सद्गुरु सत्यवान कदम यांचा सन्मान श्री. रविंद्र परब यांनी केला. श्री. सत्यविजय नाईक यांचे डॉ. अशोक मेहेंद्रे यांनी आणि श्री. दैवेश रेडकर यांचे श्री. जयदीप सावंत यांनी स्वागत केले. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा परिचय श्री. गजानन मुंज यांनी करून दिला. सभेचे सूत्रसंचालन सौ. शिवानी रेडकर यांनी, तर आभारप्रदर्शन श्री. गजानन मुंज यांनी केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment