देवीपूजनाशी संबंधित उपासनेच्या काही कृती

सर्व देवतांचे पूजन करण्याची पद्धत सारखीच असते. याविषयीचे विस्तृत विवरण (माहिती) सनातनच्या ‘पंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र’ या ग्रंथात सविस्तररित्या दिले आहे. प्रस्तूत लेखात देवीतत्त्व आकृष्ट करण्यासाठी पूजेपूर्वी कोणत्या रांगोळ्या काढाव्यात, कोणत्या देवीला कोणते फूल वहावे, उदबत्तीने कसे ओवाळावे, प्रदक्षिणा किती घालाव्यात आदी कृतींची माहिती दिली आहे.

१. देवीपूजन करण्यापूर्वी देवीतत्त्वाशी संबंधित सात्त्विक रांगोळ्या काढणे

विशेषतः मंगळवारी आणि शुक्रवारी देवीपूजनापूर्वी, तसेच नवरात्रीच्या काळात घरी किंवा देवळात देवीतत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करणार्‍या सात्त्विक रांगोळ्या काढाव्यात. श्री दुर्गादेवीतत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करणार्‍या दोन रांगोळ्यापुढे दिल्या आहेत. सर्व देवी या आदिशक्‍ति श्री दुर्गादेवीचीच रूपे असल्यामुळे त्या त्या देवीची उपासना करतांना श्री दुर्गादेवीतत्त्वाशी संबंधित रांगोळ्या काढता येतात. अशा रांगोळ्या काढल्यामुळे तेथील वातावरण देवीतत्त्वाने भारित होऊन त्याचा लाभ होतो. या रांगोळ्यांमध्ये पिवळा, निळा, गुलाबी यांसारखे सात्त्विक रंग भरावेत.

चैतन्याची अनुभूती देणारी रांगोळी

या रांगोळीत मध्यबिंदूपासून आठ दिशांना ५ ठिपके आहेत. ठिपक्यांच्या प्रत्येक रेषेतील क्र. १ चा ठिपका आणि त्यापुढील रेषांतील अनुक्रमे ३, ५, २, ४ अन् १ हे ठिपके एका मागोमाग एक असे, सर्वांत पहिला ठिपका क्र. १ येईपर्यंत जोडत जावे.

भक्‍तीभाव वाढवण्यासाठी उपयुक्‍त रांगोळी

१४ ठिपके १४ ओळी

देवघर, पाट आदींभोवती काढावयाच्या रांगोळ्या

१७ ठिपके : ३ ओळी

१९ ते १६ ठिपके

संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘देवतांची तत्त्वे आकृष्ट आणि प्रक्षेपित करणार्‍या सात्त्विक रांगोळ्या’

१ अ. देवीतत्त्व आकर्षित आणि प्रक्षेपित करणारा आकृतीबंध काही आकृतीबंधांमुळेही देवीतत्त्व आकर्षित आणि प्रक्षेपित होण्यास साहाय्य होते. असा एक आकृतीबंध येथे दाखवला आहे.

 1333293313_akruti

हा आकृतीबंध रांगोळी काढतांना, तसेच देवीभोवतीची आरास, तोरण इत्यादींमध्ये वापरल्यास देवीतत्त्वाचा अधिकाधिक लाभ होण्यास साहाय्य होते.

२. उपासनेच्या कृती करण्याच्या अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य पद्धती

प्रत्येक देवतेचे विशिष्ट उपासनाशास्त्र आहे. याचा अर्थ असा की, प्रत्येक देवतेच्या उपासनेच्या अंतर्गत प्रत्येक कृती विशिष्ट प्रकारे करण्यामागे शास्त्र आहे. आदिशक्‍ती श्री दुर्गादेवी आणि तिची सर्व रूपे (सर्व देवी) यांच्या पूजनाशी संबंधित सर्वसाधारण कृतींविषयी सूत्रे (माहिती) पुढील सारणीत दिली आहेत.

उपासनेची कृती

कृतीविषयीचे विवेचन

१. ‘पूजनाच्या पूर्वी उपासकाने स्वतःला गंध कसे लावावे ? मध्यमेने आज्ञाचक्रावर एका उभ्या रेषेत गंध लावावे.
२. देवीला गंध कोणत्या बोटाने लावावे ? अनामिकेने (करंगळीजवळील बोटाने) लावावे.
३. फुले वहाणे

अ. कोणती वहावीत ?

मोगरा, शेवंती, निशिगंध, कमळ किंवा जुई.
आ. संख्या किती असावी ? एक किंवा नऊच्या पटीत
इ. वहाण्याची पद्धत कशी असावी ? फुलांचे देठ देवीकडे करून वहावीत.
ई. फुले कोणत्या आकारात वहावीत ? फुले गोलाकार वाहून गोलातील पोकळी रिकामी ठेवावी.
४. उदबत्तीने ओवाळणे

अ. तारक उपासनेसाठी उदबत्तीचा कोणता गंध ?

चंदन, गुलाब, मोगरा, केवडा, चंपा, चमेली, जाई, वाळा, रातराणी किंवा अंबर.
आ. मारक उपासनेसाठी उदबत्तीचा कोणता गंध ? हीना किंवा दरबार
इ. संख्या किती असावी ? दोन
ई. ओवाळण्याची पद्धत कशी असावी ? उदबत्त्या उजव्या हाताची तर्जनी आणि अंगठा यांत धरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती पद्धतीने तीन वेळा ओवाळाव्यात.
५. कोणत्या गंधाचे अत्तर अर्पण करावे ? मोगरा
६. देवीला न्यूनतम (किमान) किती प्रदक्षिणा घालाव्यात ? एक किंवा नऊच्या पटीत’

एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २.१.२००५, रात्री ९.४२)

३. विशिष्ट देवीला विशिष्ट फूल वहाण्यामागील शास्त्र

‘देवतापूजनाचा एक उद्देश असा असतो की, आपण पूजा करत असलेल्या देवतेच्या मूर्तीतील चैतन्याचा आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी उपयोग व्हावा. विशिष्ट फुलांमध्ये विशिष्ट देवतेची पवित्रके, म्हणजे त्या देवतेचे सूक्ष्मातीसूक्ष्म कण आकर्षित करण्याची क्षमता इतर फुलांच्या तुलनेत जास्त असते. अशी फुले त्या त्या देवतेच्या मूर्तीला वाहिली, तर ती ती देवतेची मूर्ती जागृत होण्यास साहाय्य होऊन त्या मूर्तीतील चैतन्याचा लाभ आपल्याला लवकर होतो. त्यामुळे विशिष्ट देवतेला विशिष्ट फूल वहाण्याला महत्त्व आहे. यानुसार पुढील सारणीत काही देवी आणि त्यांना वहावयाची फुले यांची नावे दिली आहेत.

सारणीत दिलेल्या त्या त्या फुलाच्या गंधाकडे त्या त्या देवीचे तत्त्व आकृष्ट होत असल्याने त्या त्या गंधाची फुले आणि उदबत्त्या वापरल्यामुळेही त्या त्या देवीच्या तत्त्वाचा पूजकाला जास्त लाभ होतो.

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २६.९.२००५, सायं. ६.५५ आणि ७.९.२००५, दु. १२.१४)

देवी

देवीचे तत्त्व आकृष्ट करून घेणारे फूल

१. श्री दुर्गा मोगरा
२. श्री लक्ष्मी झेंडू
३. श्री सप्तशृंगी कवठी चाफा
४. श्री शारदा रातराणी
५. श्री योगेश्‍वरी सोनचाफा
६. श्री रेणुका बकुळी
७. श्री वैष्णोदेवी निशिगंध
८. श्री विंध्यवासिनी कमळ
९. श्री भवानी भुईकमळ (केशरी रंगाचे भूमीवर येणारे फूल)
१०. श्री अंबा पारिजात
संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘देवीपूजनाशी संबंधित कृतींचे शास्त्र’