बेळगाव येथील सनातनचे साधक प्रसाद हळदणकर यांनी ‘हॅगो’वर होणारे श्री दुर्गादेवीचे विडंबन रोखले !

हॅगोवर असणारे श्री दुर्गादेवीचे विडंबनात्मक चित्र

(सदरचे चित्र कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्यासाठी नाही, तर नेमकी वस्तूस्थिती लक्षात येण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आले आहे ! – संपादक)

बेळगाव, २१ ऑक्टोबर (वार्ता.) – ‘हॅगो’ हे एक ऑनलाईन गेमचे (खेळाचे) ‘अ‍ॅप्लिकेशन’ आहे. यावर एकाच वेळी ३ लक्षांपेक्षा अधिक ग्राहक जोडलेले असतात. हे ‘अ‍ॅप्लिकेशन’ उघडल्यावर त्यावर श्री दुर्गादेवीचे विडंबनात्मक चित्र असल्याचे सनातनचे साधक श्री. प्रसाद हळदणकर यांना लक्षात आले. या चित्रात श्री दुर्गादेवीच्या हाताला पंजे दाखवण्यात आले नव्हते. हेच विडंबनात्मक चित्र फेसबूक पानावरही होते. श्री. प्रसाद हळदणकर यांना हा भाग लक्षात आल्यावर त्यांनी ‘हॅगो’ या आस्थापनाला तसे कळवले. त्यावर ‘हॅगो’ या आस्थापनाने ‘आम्हाला कळवल्याविषयी धन्यवाद ! यावर आम्ही योग्य ती कारवाई करतो’, असे श्री. प्रसाद यांना कळवले. यानंतर ‘हॅगो’ने संबंधित विडंबनात्मक चित्र त्याच्या ‘अ‍ॅप्लिकेशन’मधून हटवले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment