श्री गणेशमूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन होऊ नये ! – सोलापूर येथे प्रशासनाला निवेदनाद्वारे मागणी

सोलापूर, १३ सप्टेंबर (वार्ता.) – श्री गणेशमूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन होऊ नये, तसेच मूर्तीदान ही संकल्पना राबवू नये, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील महापालिका अतिरिक्त आयुक्त श्री. श्रीकांत मायकलवार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी मायकलवार यांनी कार्यकर्त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. या वेळी हिंदुत्वनिष्ठ श्री. योगेश जमादार, श्री. संतराम कल्लावाले, श्री. बालाजी साळुंखे, श्री. रमेश पांढरे यांसह सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. मायकलवार यांना ‘दैनिक सनातन प्रभात’चा ‘श्री गणेशवंदना विशेषांक’ दिला असता त्यांनी सांगितले की, ‘या अंकामध्ये योग्य माहिती दिलेली आहे, पुष्कळ आवडला.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment