निसर्गाद्वारे मिळणारे दैवी संकेत ओळखता येणार्‍या द्रष्ट्या ऋषींचे कार्य !

प्राचीन काळी निसर्गाद्वारे मिळणारे दैवी संकेत आणि ते ओळखता येणार्‍या द्रष्ट्या ऋषींचे कार्य !

‘प्राचीन काळात ऋषींचा तपश्‍चर्या करण्यासाठी जंगलात वास असायचा. तेव्हा त्यांच्या साधनेमुळे निर्माण होणारी प्रचंड शक्ती वातावरणात पसरायची. त्यापैकी काही ईश्‍वरी शक्तीचा लाभ निसर्गाला व्हायचा. त्यामुळे तो ऋषी, राजा आणि राज्य यांच्या कार्याला साहाय्य करायचा किंवा त्याविषयी संवेदनशील असायचा. त्याची काही उदहारणे पुढीलप्रमाणे आहेत.

 

१. निसर्गाद्वारे आपत्काळाच्या संदर्भात मिळत असलेल्या पूर्वसूचना !

श्री. राम होनप

१ अ. बोरांवर पिवळा गोल आकार सिद्ध होणे

काही प्रसंगी झाडावरील बोरांच्या देठापासून बाहेरील भागावर पिवळा गोल आकार सिद्ध होत असे. अशी बोरं हे राज्याचे प्रतीक असून त्यावरील पिवळ्या गोल आकाराचा अर्थ राज्यावर सर्व दिशांनी संकट येणार असल्याचे दर्शक आहे.

१ आ. अनैसर्गिकपणे झाडाच्या पानांतून चिक गळणे

जेव्हा झाडाच्या पानांतून अनैसर्गिकपणे चिक गळू लागतो, त्या प्रक्रियेला ‘निसर्गाचे ऋदन’ किंवा ‘वृक्षऋदन’, असे म्हणतात. त्या वेळी राज्यावर संकट येणार असल्याचे हे दर्शक मानले जात होते.

 

२. निसर्गाद्वारे संपत्काळाच्या  संदर्भात मिळत असलेली पूर्वसूचना

२ अ. झाडाच्या पानांवर मोराचा आकार उमटणे

कधीकधी झाडाच्या पानांवर मोराचा आकार येत होता. ही पाने ऋषी आपल्या राज्यातील राजाला पाठवत होते. त्या वेळी ते राजाला त्यातून संदेश देत ‘आताचा काळ राज्याच्या दृष्टीने सुरक्षित आणि चांगला आहे. काळजीचे कारण नाही.’

३. ज्ञानी ऋषिंचे राज्य सुरक्षित आणि सर्वाधिक सामर्थ्यशाली मानले जात असणे

राज्याच्या संदर्भात घडणार्‍या वैशिष्ट्यपूर्ण घडामोडींचे ज्ञान त्या काळच्या ज्ञानी ऋषींनी विविध प्रकारे होत असे आणि तसा संदेश ते राज्याच्या राजाला देत होते.

संकटकाळी ऋषी ध्यानाद्वारे राज्यावर लक्ष ठेवत होते. ज्ञानी ऋषी ज्या राज्यात आहेत, ते राज्य सुरक्षित आणि सर्वाधिक सामर्थ्यशाली मानले जाई.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

Leave a Comment