भृगुसंहिता आणि सप्तर्षि जीवनाडी

भृगु महर्षि
भृगु महर्षि

 

१. सप्तर्षींच्या गटात भृगु ऋषी नसणे, भृगु म्हणजे महर्षींचे महर्षी म्हणून मीच आहे, असे श्रीकृष्णाने गीतेतील १० व्या अध्यायात सांगणे

नाडीपट्टी
नाडीपट्टी

सप्तर्षींच्या गटात भृगु येत नाहीत. ते सप्तर्षींच्याही वर आहेत. साक्षात् भगवान श्रीकृष्णाने गीतेच्या १० व्या अध्यायात म्हटले आहे, महर्षींमधले महर्षी जे आहेत, त्यात भृगु म्हणजे मीच आहे.

 

२. भृगुसंहितेतील विवरण संक्षिप्त असणे, तर सप्तर्षी जीवनाडीतील विवरण हे महर्षींनी विस्ताराने केलेले असणे

सप्तर्षींनी नाडीपट्टीत केलेले विषयाचे विवरण हे भृगुपत्रापेक्षा अधिक, म्हणजेच विस्ताराच्या रूपात असते. भृगु महर्षींचे बोल हे बहुधा संक्षिप्त रूपात असतात.

 

३. स्थळासंदर्भात नाडीपट्टी आणि संहितेविषयीचे वसतीस्थान

भृगुसंहिता बहुतांशी होशियारपूर, पंजाब येथे आहेत. तेेथे अनेक भृगुवाचक आहेत; मात्र नाड्या या अधिकांश तमिळनाडू राज्यातील वैदीश्‍वरन् नावाच्या गावाच्या परिसरात अधिक आहेत.

 

४. नाडीपट्टी आणि भृगुसंहितेतील संवादातील पात्रे

सप्तर्षि जीवनाडीपट्टीतील संवाद हा वसिष्ठ आणि विश्‍वामित्र यांच्यातील आहे, तर भृगुसंहितेतील संवाद हा भृगुमहर्षि आणि त्यांचा पुत्र शुक्र यांच्यामधील आहे. यांत शुक्राने विचारलेल्या प्रश्‍नांना भृगुमहर्षि उत्तर देतात.

 

५. हस्तलिखितातील भाषा बहुतांश भृगुसंहिता ही संस्कृतमध्ये असणे, तर नाडीपट्टी ही जुन्या तमिळ भाषेत असणे

बहुतांश भृगुसंहिता ही संस्कृतमध्ये आहे; परंतु या भृगुपत्रांचे पूर्वी काही संतांनी हिंदीतही भाषांतर केले आहे; परंतु नाडीपट्ट्या मात्र जुन्या तमिळमध्येच आहेत. अनेक सिद्धांनी हे लिखाण ताडपत्रांवर जतन करून ठेवले आहे. सध्या जतन केलेले हे लिखाण ४०० – ५०० वर्षांपूर्वीचे आहे. यांच्या प्रती पूर्वी दर काही वर्षांनी परत लिहिल्या जात होत्या. त्या वेळी ताडपत्रावर लिहिणारेही होते; परंतु आता तेही दुर्मिळ झाले आहेत. बरीच ताडपत्रे संस्काराविना अशीच पडून आहेत. तमिळनाडू येथील तंजावर जिल्ह्यातील प्रसिद्ध सरस्वती महल या ग्रंथालयात सहस्रोंच्या संख्येने ताडपत्रे आहेत आणि त्यांत अनेक प्रकारचे ज्ञान दडलेले आहे; परंतु सध्या हे ज्ञान वाचणारे नाडीवाचक उपलब्ध नाहीत, तसेच त्याचा अभ्यास करायलाही कुणी तयार नाही. ताडपत्रावर लिहिणे अतिशय अवघड असते. आम्ही चौकशी केली असता, असे आढळून आले की, सध्या तंजावरमध्येही असे लिहिणारे एक-दोघेच उरले आहेत. – (पू.) सौ. अंजली गाडगीळ (कोळ्ळिमलय पर्वतक्षेत्र, तमिळनाडू, ३०.६.२०१६, दु. ५)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात