पुणे येथील एम्आयटीचे प्रकल्प संचालक डॉ. मिलिंद पांडे यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट

डॉ. मिलिंद पांडे (डावीकडून दुसरे) आणि त्यांचे कुटुंबीय यांना सनातन प्रभात नियतकालिकांविषयी माहिती देतांना डॉ. (सौ.) नंदिनी सामंत (उजवीकडे)

रामनाथी (गोवा) – पुणे येथील एम्आयटीचे (महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे) प्रकल्प संचालक डॉ. मिलिंद पांडे यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांना साधिका डॉ. (सौ.) नंदिनी सामंत यांनी आश्रमात चालणारे राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य, तसेच आध्यात्मिक संशोधन यांविषयी माहिती दिली. डॉ. पांडे यांच्या समवेत त्यांच्या पत्नी आणि ३ मुली उपस्थित होत्या.

या वेळी डॉ. पांडे यांनी आश्रमात झालेले दैवी पालट उत्सुकतेने पाहिले आणि ‘या संदर्भात कशा प्रकारे संशोधन करू शकतो’, याविषयी मार्गदर्शन केले, तसेच अधिक वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन करण्याच्या संदर्भात रुची दर्शवली. आश्रमाविषयी प्रशंसोद्गार काढतांना त्यांनी आश्रमातील व्यवस्थापन अतिशय सुयोग्य आणि आदर्श असल्याचे म्हटले.

Leave a Comment