रामनाथी आश्रमात वाईट शक्तींनी काही प्राण्यांच्या माध्यमातून स्थुलातून वावरून आश्रमातील चैतन्य नष्ट करण्यासाठी त्रासदायक शक्तीचे प्रक्षेपण करण्याविषयी लक्षात आलेल्या घटना

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमामध्ये पूर्वी पक्षी मरून पडत असत. आता काही दिवसांपासून आश्रमात आणि आश्रमाच्या परिसरामध्ये प्रथमच त्रासदायक शक्ती विविध असात्त्विक प्राण्यांच्या माध्यमातून स्थुलातून वावरत आहेत आणि त्या आश्रमातील चैतन्य न्यून करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासंदर्भात लक्षात आलेल्या घटना पुढे देत आहे.

कु. प्रियांका लोटलीकर

१. सप्टेंबर २०१७ पासून आश्रमाच्या तिसर्‍या आणि चौथ्या मजल्यावर एक मांजरी रात्रीच्या कालावधीत वावरतांना दिसली. ती बर्‍याच वेळा आश्रमात ठिकठिकाणी घाण करून ठेवते. दिवसभरात ती कुठेही दिसत नाही आणि रात्री तिचा ओरडण्याचा आवाज येतो.

२. ३.११.२०१७ या दिवशी एक काळा कुत्रा आश्रम परिसरात दिसला. त्याला हाकलल्यावर तो आश्रमाच्या पूर्वेकडे असणार्‍या झाडीमध्ये थांबला. नंतर त्याच्या दिशेने दगड मारूनही तो तेथून जात नव्हता. त्या रात्री तो १२ वाजल्यापासून सतत रडत होता.

३. ऑक्टोबर २०१७ मध्ये आश्रमामध्ये कबुतरांचा वावर पुष्कळ प्रमाणात वाढल्याचे लक्षात आले. ही कबुतरे आश्रमातील मार्गिकांमध्ये असणार्‍या वायरवर बसून त्रासदायक आवाज काढतात आणि सज्जावर घाण करतात.

– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१०.११.२०१७)

 

आश्रमातील चैतन्यमय प्रसाद ग्रहण करत असल्यामुळे खाण्याच्या आवडी-निवडी न्यून होणे

१. सात्त्विक ठिकाणी मिळणार्‍या प्रसादात तेथील चैतन्य कार्यरत असल्याने तो रुचकर लागणे

‘सात्त्विक ठिकाणी म्हणजे मंदिरे, संतांची समाधीस्थळे किंवा आश्रम यांतील महाप्रसादाची चव बाहेरील कोणत्याही अन्नाच्या तुलनेत पुष्कळ रुचकर लागते. आपल्यापैकी अनेकांनी ही अनुभूती घेतली असेल, उदा. गोंदवले आणि पावस येथील तांदुळाची खिचडी, सज्जनगड येथील खीर इत्यादी. अनेक वर्षे हा पदार्थ खाऊन त्याचा कंटाळा येत नाही. उलट तो पदार्थ खावासा वाटतो. तेथे संतांच्या स्थुलातून आणि सूक्ष्मातील अस्तित्वामुळे तेथील पदार्थामध्ये चैतन्य कार्यरत होते. त्यामुळे ‘पदार्थ कोणता आहे ?’, हे महत्त्वाचे असत नाही. त्या पदार्थातील चैतन्य एक प्रकारच्या तृप्तीची अनुभूती देते.

२. बाहेरचे पदार्थ खाल्ल्यावर तृप्तीची भावना नसणे

पूर्वी मला खाण्याची पुष्कळ आवड-निवड होती. बाहेरचे पदार्थ खाल्ल्यावर माझे समाधान व्हायचे, तरीही पदार्थ खाऊनही मनात तृप्तीची भावना नसायची.

३. ‘रामनाथी आश्रमातील अन्नपदार्थ अन्नपूर्णादेवीचा प्रसाद आहे’, असे जाणवणे

आता हळूहळू मला ‘बाहेरचे पदार्थ खायला नको. रामनाथी आश्रमातीलच अन्नपदार्थ खाऊया. मग ते काहीही असो’, असे मला वाटते. मला त्यातच आनंद मिळू लागला. ‘रामनाथी आश्रमातील अन्नपदार्थ अन्नपूर्णादेवीचा प्रसाद आहे’, असे मला जाणवते.

४. रामनाथी आश्रमातील प्रसाद अल्प प्रमाणात ग्रहण करूनही समाधान होणे

सनातनच्या रामनाथी आश्रमातील स्वयंपाक संतांनी (पू. (कु.) रेखा काणकोणकर आणि कधी पू. विनय भावे यांनी) बनवलेला असल्यामुळे चैतन्यमयी प्रसाद ग्रहण करून माझ्या मनाला तृप्ती मिळते. मी अल्प प्रमाणात महाप्रसाद ग्रहण करूनही मला समाधान मिळते. त्यामुळे माझ्यातील आवडीचे खाणे, बाहेरचे खाणे, असे संस्कार परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने न्यून झाले. त्यामुळे मला त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटते.’

– कु. प्रियांका लोटलीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.१०.२०१७)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment