विजयादशमीनिमित्त पुणे येथे दुर्गामाता दौडीत सनातन संस्थेचा सहभाग !

छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करताना श्री. प्रवीण नाईक

पुणे  – विजयादशमीच्या दिवशी येथील पाषाण भागात घेण्यात आलेल्या दुर्गामाता दौडीत सनातन संस्थेच्या साधकांनी सहभाग घेतला. श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री अक्षय भेगडे, ऋषिकेश कुलकर्णी आणि ओंकार तोडकर यांनी सकाळी ६ ते ८ या वेळेत दौडीचे आयोजन केले होते. प्रारंभी सनातन संस्थेचे श्री. प्रवीण नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आरती केली. आरतीनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातून दौडीला प्रारंभ झाला. बालाजी मंदिर आणि कोकाटे तालीम येथेही दौडीचे स्वागत करण्यात आले. दौडीत ५० हून अधिक धारकरी आणि धर्मप्रेमी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment