विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पुणे महापौरांना निवेदन

अखिल भारत हिंदुमहासभा आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पुणे महापौरांना निवेदन

‘कृत्रिम हौदामध्ये गणेशमूर्ती विसर्जनानंतर होणारी विटंबना थांबवावी !’

पुणे  – गणेशमूर्ती कृत्रिम हौदामध्ये विसर्जन करणे, हे धर्मशास्त्राच्या विरोधात आहे. असे कृत्रिम हौद बांधून धर्मशास्त्र आणि हिंदूंच्या धर्मबांधवांचा अनादर होत आहे. हौदातील मूर्ती नंतर पुन्हा नदीत विसर्जन केल्या जातात किंवा त्या मूर्ती अयोग्य पद्धतीने हाताळणी अन् वाहतूक केल्या जातात. त्यामुळे श्री गणेशमूर्तीची होणारी विटंबना थांबवावी, यासाठी महानगरपालिकेने योग्य ती उपाययोजना आणि कारवाई करावी. याचसमवेत धर्मशास्त्रानुसार शाडूमातीची मूर्ती ही पर्यावरणपूरक आहे. पुढील वर्षी पालिकेने पुढाकार घेऊन प्रबोधन करावे, अन्यथा आम्हाला जनआंदोलनाचा अवलंब करावा लागेल, अशा आशयाचे निवेदन अखिल भारत हिंदुमहासभा, हिंदू महासभा, समस्त हिंदू आघाडी, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था या हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी महापौर सौ. मुक्ता टिळक यांना ४ सप्टेंबरला दिले.

 

Leave a Comment