कसबा सांगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील मारुति मंदिरात कायमस्वरूपी फलक प्रदर्शनाचे अनावरण !

सनातनच्या धार्मिक प्रदर्शनाचे अनावरण करतांना आधुनिक वैद्य श्री. मानसिंग शिंदे

कसबा सांगाव : सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी सिद्ध केलेल्या धार्मिक फलकांचे प्रदर्शन येथील मारुति मंदिरात कायमस्वरूपी लावण्यात आले. या फलकांचे अनावरण कागल तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक श्री. राजेंद्र माने, शिवसेनेचे तालुका प्रमुख श्री. शिवगोंडा पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्री. मनोज कोडोले आणि सनातन संस्थेचे आधुनिक वैद्य श्री. मानसिंग शिंदे यांच्या हस्ते २७ ऑगस्टला झाले.

शिवसेना तालुका प्रमुख श्री. शिवगौंडा पाटील, सर्वश्री बाळासो पाटील (हेळवे), शिवाजीराव माने, विक्रमसिंह माने, नितीन सुतार, किरण कालेकर, रा.स्व. संघाचे सर्वश्री संदिप खडके, सचिन माळी, कुलदीप मेटे, सनातन संस्थेचे सर्वश्री दीपक भोपळे, कृष्णात निकम, अक्षय बुरसे, अजिंक्य विभुते, हिंदु जनजागृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे यांसह ३५ हून हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

१. श्री. राजेंद्र माने म्हणाले की, सनातन संस्थेने राबवलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. या फलकामुळे आम्हाला ‘देवळात देवाचे दर्शन कसे घ्यायला हवे’, हे समजले. आज सर्व हिंदू जातीपातींमध्ये अडकले आहेत. त्यांना हिंदु धर्मातील छोट्या छोट्या धार्मिक कृती कशा करायला हव्यात, हे माहीत नाही. या फलकांमुळे ही धार्मिक माहिती गावातील लोकांना सहजपणे उपलब्ध झाली आहे.

२. सनातन संस्थेचे आधुनिक वैद्य श्री. मानसिंग शिंदे यांनी हे प्रदर्शन लावण्यामागील उद्देश विशद केला. हिंदु धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी सर्व हिंदूंनी आपले पद, पक्ष, संघटना हे सर्व बाजूला ठेवून हिंदु म्हणून एक होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी ‘आदर्श गणेशोत्सव कसा असावा’ या संदर्भातील ध्वनीचित्र चकती दाखवण्यात आली.

३. हे प्रदर्शन लावण्यासाठी मारुति मंदिर देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अमर माने यांनी अनुमती दिली, तसेच सर्वश्री मनोज कोडोले, अविनाश पाटील. संजय जगताप, धोंडीबा पाटील, विशाल पाटील (वंदुर) यांनी आर्थिक साहाय्य केले. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.

Leave a Comment