सातारा येथे गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन !

श्री गणेशमूर्तीचे सातव्या दिवशी वहात्या पाण्यात विसर्जन करून भाविकांनी केले धर्मपालन !

सनातन आणि हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनाचा परिणाम

शहरातील कृत्रिम तलावांना भाविकांचा अत्यल्प प्रतिसाद

सातारा – सातव्या दिवशी गौरी समवेत घरगुती गणपतींचे विसर्जन मोठ्या प्रमाणात होते. प्रशासनाने काही धर्मद्रोही सामाजिक संघटनांच्या नादी लागून शहरामध्ये गणपति विसर्जनासाठी ठिकठिकाणी कृत्रिम हौद निर्माण केले होते; मात्र धर्माचरणी गणेशभक्तांनी या कृत्रिम हौदाकडे पाठ फिरवत श्री गणेशमूर्तींचे विसर्जन संगम माहुली येथील कृष्णा आणि वेण्णेच्या पवित्र संगमावर विधीवत् केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी गणेशोत्सवाच्या काळात विशेष मोहीम राबवण्यात येते. या अंतर्गत आदर्श गणेशोत्सव कसा असावा, गणपतीची मूर्ती, रंग, उंची, गणेशमूर्ती वहात्या पाण्यात विसर्जन करण्यामागील शास्त्र याविषयी प्रबोधन करण्यात येते. या वर्षीही संगम माहुली आणि वाढे फाटा येथील नदीकाठावर ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 

मोहिमेसाठी माहुली ग्रामपंचायतीचे अमूल्य सहकार्य

हिंदु जनजागृती समितीच्या या उपक्रमासाठी माहुली ग्रामपंचायतीचे कृतीच्या स्तरावर अमूल्य सहकार्य लाभले. पंचायतीने भाविकांचे प्रबोधन करण्यासाठी समितीला ध्वनीक्षेपक उपलब्ध करून दिला. या ध्वनीक्षेपकावरून समितीच्या कार्यकर्त्यांनी भाविकांचे प्रबोधन तर केलेच आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत पार पडण्यासाठी सूचनाही दिल्या. तसेच निर्माल्याच्या प्लास्टिकच्या पिशव्या नदीपात्रात न टाकण्याचे आवाहन केले. याला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला.

 

क्षणचित्रे

१. भाविकांचे प्रबोधन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते नदीकाठी विसर्जनस्थळी प्रबोधन करणारे फलक घेऊन उभे होते.

२. गतवर्षी संगम माहुली आणि वाढे फाटा येथे काही धर्मद्रोही संघटनांच्या वतीने गणेशमूर्ती दान मोहीम राबवण्यात आली होती. या वर्षी मात्र धर्मद्रोही नदीकाठावर फिरकलेही नाहीत.

३. गणेशमूर्ती विसर्जनावरून वाद नको यासाठी काही भाविकांनी गणेशमूर्ती नागठाणे, सोनगाव आणि परळी भागातून वहाणार्‍या उरमोडी नदीपात्रात विसर्जन केले.

 

Leave a Comment