जळगाव पिपल्स बँकेत ‘श्री गणेशपूजेतील अध्यात्मशास्त्र’ विषयावर प्रवचन

प्रवचन ऐकतांना पिपल्स बँकेतील कर्मचारी

जळगाव  – शहरातील प्रख्यात जळगाव पिपल्स बँकेत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ‘श्री गणेशपूजेतील अध्यात्मशास्त्र’ आणि ‘भारतीय सण-उत्सवामांगील विज्ञान’ या विषयांवर व्याख्यान घेण्यात आले.

या वेळी सनातन संस्थेच्या साधिका सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी गणेश चतुर्थी ते अनंतचतुदर्शी या काळात श्री गणेशाची उपासना कशा पद्धतीने करावी, गणपतीला लाल फुुले, दुर्वा का वाहतात, श्री गणेशमूर्ती विसर्जन वहात्या पाण्यात का करावे, अथर्वशीर्ष तसेच गणेशस्तोत्र यांचे पठण केल्याने काय लाभ होतात यांवर विश्‍लेषण केले.

हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी भारतीय सण-उत्सवांमागील विज्ञान आणि अध्यात्मशास्त्र या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी उपस्थित बँक कर्मचार्‍यांनी अनमोल अशी माहिती दिल्याविषयी आभार मानलेे.

या कार्यक्रमाला जळगाव पिपल्स बँकेचे अध्यक्ष श्री. भालचंद्र पाटील, श्री. डी.वाय्. पाटील, शाखा व्यवस्थापक श्री. राजेंद्र सोनार यांच्यासह दाणाबाजार शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.

क्षणचित्रे 

१. जळगाव पिपल्स बँकेचे अध्यक्ष श्री. भालचंद्र पाटील यांनी ‘आमच्या बँकेत आपले कार्यक्रम  आयोजित करा, आपले कार्य उत्कृष्ट असे आहे’, असे सांगितले.

२. श्री. डी.वाय्. पाटील म्हणाले, ‘‘ताण-तणाव या विषयावर आपण मार्गदर्शन करावे. आम्ही शहरातील ९ शाखांमधील सर्व कर्मचार्‍यांना एकत्रित करू.’’

३. आमच्या वाचनालयासाठी आपले ग्रंथ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.

 

Leave a Comment