श्री गणेशोत्सवाच्या संदर्भातील धर्मशास्त्र सांगणे, हा स्तुत्य उपक्रम ! – शिक्षकांची प्रतिक्रिया

कोल्हापूर येथे शिक्षण संस्था आणि देवालय येथे सनातन संस्थेच्या वतीने व्याख्याने

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल (स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था) येथे श्री गणेश चतुर्थीनिमित्त श्री गणेश या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये शास्त्रानुसार गणेशमूर्ती कशी असावी ? त्याचे पूजन कसे करावे ? श्री गणेशाची कृपा आपल्यावर होण्यासाठी या काळात कसे प्रयत्न करावेत ? गणेशमूर्ती शास्त्रनुसार विसर्जन का करावी ? याविषयी विस्तृत माहिती सांगण्यात आली. याचा लाभ ३६२ विद्यार्ध्यांनी घेतला. तर विक्रम हायस्कूल येथे ३७५ विद्यार्थ्यांनी याच विषयावरील व्याख्यानाचा लाभ घेतला. हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे, असे शिक्षकांनी सांगितले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूलच्या प्राचार्य सौ. चव्हाण यांनी ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी वरील विषयावरील व्याख्यान आयोजित केले होते.

श्री गणेश देवालय, हेरले येथील हितचिंतक श्री. भूपाल मिस्त्री यांनी स्वत: त्यांना गावी श्री गणेश चतुर्थीनिमित्त प्रवचनाचे आयोजन केले. या प्रवचनाचा लाभ ५२ जिज्ञासूंनी घेतला. त्यांनी त्यांच्या गावामध्ये असे कार्यक्रम घेऊन प्रसार वाढवण्याची इच्छा व्यक्त केली. याठिकाणी प्रती मास एक प्रवचन घेऊया, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment