सनातनच्या साधकांनी केलेल्या प्रबोधनानंतर मुंबई येथील डी मार्ट मधील श्रीगणेशाची विडंबनात्मक मूर्ती पालटली

हिंदूंनो, अशास्त्रीय श्री गणेशमूर्ती विषयी प्रबोधन करून धर्मकर्तव्य बजावा !

विडंबनात्मक मूर्ती
पालटलेल्या मूर्ती

मुंबई – शहरातील पवई येथील एका डी मार्ट मध्ये गणपतीच्या आकाराप्रमाणे भांडी रचून त्याला सोंड लावून विडंबनात्मक श्री गणेशाची मूर्ती साकारण्यात आली होती. सनातनच्या साधकांनी केलेल्या प्रबोधनानंतर डी मार्टच्या व्यवस्थापनाने ही विडंबनात्मक श्री गणेशमूर्ती पालटून त्या ठिकाणी सात्त्विक श्री गणेश मूर्ती ठेवल्या. (शास्त्र समजल्यावर तत्परतेने त्यानुसार कृती करणार्‍या डी मार्टमधील व्यवस्थापनाचे अभिनंदन ! हिंदु बांधवांनो, आपल्या देवतांच्या अशास्त्रीय मूर्ती साकारून धर्महानी होऊ देऊ नका. देवतांचे विडंबन होणार नाही, याविषयी काळजी घ्या. – संपादक) 

१७ ऑगस्ट या दिवशी पवई येथील धर्मप्रेमी श्री. रूपेश शर्मा येथील एका डी मार्टमध्ये खरेदीसाठी गेले होते. त्या वेळी त्यांनी श्री गणेशाचे विडंबन करणारी वरील रचना पाहिली. या विषयी श्री. रूपेश यांनी तात्काळ सनातनचे साधक श्री. प्रसाद कदम यांना संपर्क करून वरील माहिती सांगितली. (श्री गणेशाचे विडंंबन पाहिल्यावर ते रोखण्यासाठी तत्परतेने कृती करणारे धर्मप्रेमी श्री. शर्मा आणि श्री. प्रसाद कदम यांची कृती सर्वत्रच्या हिंदूंसाठी अनुकरणीय आहे. – संपादक) श्री. प्रसाद कदम यांनी १९ ऑगस्ट या दिवशी डी मार्ट मध्ये जाऊन त्याविषयी खात्री केली. त्यानंतर श्री. प्रसाद कदम यांसह सौ. रजनी परब, सौ. शोभा धनवडे, सौ. धनश्री त्रिंबककर या सनातनच्या साधकांनी डी मार्टमध्ये जाऊन प्रबोधन केले. त्यानंतर डी मार्टच्या व्यवस्थापनाने श्री गणेशाची विडंबनात्मक मूर्ती काढून त्या ठिकाणी श्री गणेशाच्या सात्त्विक मूर्ती ठेेवल्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment