हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गडहिंग्लज येथे प्रांताधिकार्‍यांना निवेदन ; सनातन संस्थेचाही सहभाग !

(उजवीकडे) प्रांताधिकारी सौ. संगीता चौगुले यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

डहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) : येथील प्रांताधिकारी सौ. संगीता चौगुले, पोलीस उपनिरीक्षक व्ही.व्ही. कुरणे आणि गटशिक्षण अधिकारी  जी.बी. कमळकर यांना १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाचा अवमान रोखून त्याचा मान राखावा, या मागणीचे निवेदन २ ऑगस्टला देण्यात आले. या वेळी शिवसेना शहरप्रमुख श्री. सागर कुराडे, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री अशोक शिंदे, संजय संकपाळ, विलास  पोळ, काशिनाथ गडकरी, रोहित पोवार, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अजित धुळाज, सनातन संस्थेच्या सौ. रंजना पाटील उपस्थित होत्या.

या वेळी प्रांताधिकार्‍यांना कागदी लगद्यापासून बनवण्यात येणार्‍या श्री गणेशमूर्तींना प्रशासनाने प्रोत्साहन देणे थांबवावे, या मागणीचेही निवेदन देण्यात आले.

राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासंबंधी कारंजा येथे तहसीलदारांना निवेदन

कारंजा (यवतमाळ) : येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment