परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त हिंदुत्वनिष्ठांनी ट्विटरद्वारे व्यक्त केलेले अभिप्राय (ट्वीट)

१. हिंदु राष्ट्र किंवा आध्यात्मिक भारत म्हणजे संघटित होऊन भारतास सांस्कृतिकदृष्ट्या बलवान करणे होय ! – कर्नल अशोक किणी, अध्यक्ष, फेथ फाऊंडेशन.

२. देशातील सध्याच्या सर्व समस्यांवर एकमेव आणि कायमस्वरूपी उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना, असा उद्घोष करणारे परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी वंदन ! – श्री. टी. राजासिंह, आमदार, भाजप, तेलंगण.

३. धार्मिक चळवळ आणि हिंदु उत्क्रांती यांद्वारे वर्ष २०२३ पर्यंत हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी प्रेरणादायी ठरलेल्या परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी प्रणाम ! – रीक्लेम टेम्पल्स

(टीप : धर्मांधांकडून हिंदूंच्या नष्ट करण्यात आलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी चालू करण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठ चळवळीला रीक्लेम टेम्पल्स असे नाव देण्यात आले आहे. या चळवळीच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून व्यक्त करण्यात आलेला हा अभिप्राय आहे.)

४. सूर्याप्रमाणे नियमित प्रकाशणार्या आध्यात्मिक आणि निर्मळ हिंदु राष्ट्रासाठी कार्य करणार्या अन् अनेक हिंदूंसाठी प्रेरणादायी ठरलेल्या परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी प्रणाम ! – श्री. शिवराज तलवार, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

५. अध्यात्मातील अधिकारी व्यक्तीमत्त्व असलेले परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयपूर्तीसाठी अथक प्रयत्नरत आहेत. – श्री. उन्मेश गुजराथी, लेखक आणि संपादक

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment