गोड पदार्थ जेवणाच्या सुरूवातीला खावे की शेवटी ?

sweet_dish_ras_malai

आपण भारतीय लोक पाश्‍चात्त्य ते ते चांगले, या अपसमजात इतके दंग आहोत की, आपण आपले कपडेच नव्हेत, तर राहणीमान आणि आहारसुद्धा त्यांच्याचप्रमाणे नक्कल करून घेण्यास सुरुवात केली आहे. स्वीट डिश हा त्यातलाच एक प्रकार. स्वीट डिश हा परदेशात जेवणाच्या शेवटी खाण्याचा प्रकार समजला जातो. आयुर्वेद मात्र मधुर रसाचे पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावे, असे सांगतो. असे केल्याने वाताचे शमन होते आणि अन्न पचनास अडथळा देखील येत नाही, हे आयुर्वेदाचे मत.

आयुर्वेदाचे मत आधुनिक शास्त्राच्या दृष्टीने विचार करता सुद्धा अधिक शास्त्रीय आहे. गोड पदार्थ पचायला जड असतात. जेवणाच्या सुरुवातीलाच त्यांचे सेवन केल्याने त्यांचे पचन तर उत्तम होतेच शिवाय पुढे आपण जे जेवण घेतो त्याचे प्रमाणही मर्यादेत रहाते. याउलट जेवणाच्या शेवटी आणि त्यातही थंड करून गोड पदार्थ खाल्ल्यास जठराचे तापमान न्यून होऊन पचनाचा बोजवारा उडतो. याकरताच गोड पदार्थ खायचे असल्यास ते जेवणाच्या सुरुवातीला किंवा किमान जेवतांना मध्ये-मध्ये तरी खावेत. जेवणाच्या शेवट स्वीट डिश खाण्याची पाश्‍चात्त्य प्रथा मात्र आपल्या देशात निश्‍चितपणे घातक आहे.

– वैद्य परिक्षित शेवडे, (एम्डी, आयुर्वेद), डोंबिवली

(वैद्य परीक्षित शेवडे यांच्या व्हॉटस्-अ‍ॅपवरील/लेखातील निवडक सूत्रे.)