साधकाकडील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रामध्ये वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे त्रासदायक पालट होऊन ते छायाचित्र काही वर्षांनी अधिकाधिक विद्रूप होत जाणे

प्राचीन काळी ऋषीमुनी यज्ञयागादी विधी करत. त्या वेळी राक्षस त्यात विघ्ने आणत, ऋषीमुनींना जिवे मारत, ऋषीमुनींच्या आश्रमातील गायींना मारून खात, हा इतिहास आपल्याला ठाऊक आहे. असुरांनी त्रेता आणि द्वापर युगांत देवतांना, तसेच प्रभु श्रीरामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण या साक्षात् अवतारांनाही त्रास दिला; पण देवता अन् अवतार यांनी असुरांशी युद्ध करून धर्मविजय मिळवला, हे आपण जाणतोच. आतापर्यंत जितकी देवासुर युद्धे झाली, त्यांत अंतिमतः जय हा देवता, अवतार आणि देवतांचा पक्ष घेऊन लढणारे यांचा झाला आहे, हा इतिहास आहे. सप्तलोकांतील दैवी किंवा चांगल्या शक्ती आणि सप्तपाताळांतील वाईट शक्ती यांत चालू असणार्‍या या लढ्याचे भूतलावर स्थुलातून होणारे प्रगटीकरण आजही दिसून येते.

 

१. कलियुगातील देवासुर लढा !

प्रत्येक युगात देवासुर लढा निरंतर चालू असतो. सध्या कलियुगातही तो चालू आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी महर्षि अरविंद यांनी सूक्ष्मातील लढा देऊन भारताच्या वायव्येकडून येणार्‍या वाईट शक्तींचे निर्मूलन केले होते. याविषयी त्यांच्या चरित्रात उल्लेख आहे. आजही भारतातील अनेक ज्ञात-अज्ञात संत, तसेच सनातनचे संत देवतांच्या पक्षातून लढत आहेत. ब्राह्मतेज, म्हणजेच साधनेचे बळ असलेलेच सूक्ष्मातून युद्ध लढू शकतात.

 

२. साधकांना होणारे वाईट शक्तींचे त्रास आणि त्यांची कारणे

बर्‍याच साधकांना मागील १५ वर्षांपासून वाईट शक्तींचे त्रास होत आहेत. हे त्रास मुख्यत्वे समष्टी साधना, म्हणजे धर्मप्रसार करणार्‍या साधकांना होत आहेत. असे असले, तरी त्रास होणार्‍यांपैकी काही जण संतपदालाही पोचले आहेत. ‘वातावरणातील वाईट शक्ती सनातनच्या साधकांना त्रास का देतात ?’, असा प्रश्‍न काही जणांना पडेल. याचे उत्तर पुढीलप्रमाणे आहे. ‘पृथ्वीवरील सात्त्विकता नष्ट करणे आणि दुष्प्रवृत्तींच्या माध्यमातून भूतलावर आसुरी राज्याची स्थापना करणे’, हे सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींचे ध्येय असते आणि त्यासाठी त्या प्रयत्न करत असतात. याउलट सनातनचे साधक समष्टी साधना म्हणून समाजाला साधना करण्यासाठी उद्युक्त करून पृथ्वीवरील सात्त्विकता वाढवण्यासाठी आणि भूतलावर ‘ईश्‍वरी राज्य’, म्हणजेच ‘विश्‍वकल्याणार्थ कार्यरत असलेल्या सात्त्विक लोकांचे राज्य’ स्थापण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ‘आसुरी राज्य’ स्थापण्यासाठी प्रयत्नशील असणार्‍या वाईट शक्तींच्या प्रयत्नांना खीळ बसते; म्हणून त्या समष्टी साधना करणार्‍या सनातनच्या साधकांच्या कार्यात आणि सेवेत अनेक विघ्ने आणतात, तसेच साधकांचे शरीर, मन, कपडे, तसेच साधकांच्या वास्तूतील देवतांची चित्रे, वस्तू आदींवर सूक्ष्मातून आक्रमणे करतात.’ पुढील छायाचित्रांतून ‘वाईट शक्ती कशा प्रकारे आक्रमण करतात ?’, हे प्रत्यक्ष पहायला मिळेल.

 

३. वाईट शक्तींनी तीव्रतेने आक्रमण केल्याने पूर्णपणे विद्रूप झालेली आणि
छायाचित्रांतील काहीच ओळखता न येणारी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची छायाचित्रे

येथे विद्रूप झालेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची छायाचित्रे दिली आहेत. ही छायाचित्रे ‘एका साधकाच्या घरातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे एक छायाचित्र अधिकाधिक विद्रूप होऊन वेगवेगळ्या वर्षी कसे दिसू लागले ?’, हे दर्शवतात. त्या ४ छायाचित्रांची माहिती येथे दिली आहे. छायाचित्रांमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले आसंदीवर बसलेल्या स्थितीत आहेत आणि त्यांचा माड्यांपर्यंतचा भाग आहे. पुढील छायाचित्रांविषयीच्या मजकुराच्या मथळ्यांमध्ये ‘छायाचित्र क्रमांक’ आणि ‘ते केव्हाचे आहे ? (दिनांक/वर्ष)’, हे दिले आहे.

३ अ. छायाचित्र क्र. १ – डिसेंबर २०१०

पहिले छायाचित्र (छायाचित्र क्र. १) डिसेंबर २०१० मधील असून त्यामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रात त्यांच्या डोक्यापासून कमरेपर्यंतच्या भागावर, तसेच हातांवर गोलाकार लहान काळसर डाग दिसत आहेत. यांतील काही डाग गडद, तर काही डाग फिकट आहेत. छायाचित्रात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या तोंडवळ्याच्या उजव्या बाजूकडील भिंतीच्या पांढर्‍या पार्श्‍वभूमीवरही काळसर डाग दिसत आहेत.

३ आ. छायाचित्र क्र. २ – ४.९.२०१२

पुढे साधारण २० मासांनी (महिन्यांनी) हे छायाचित्र परत पाहिले असता त्या छायाचित्रामध्ये पालट झालेला आढळून आला. छायाचित्र क्र. १ शी तुलना करता या छायाचित्रामधील डागांचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आजूबाजूलाही अधिक प्रमाणात डाग दिसत आहेत. तसेच डाग गडद झाले असून ते पसरटही झाले आहेत. या छायाचित्राच्या वरच्या आणि डाव्या बाजूच्या कडांवर ओरखडेही आले आहेत. छायाचित्र क्र. १ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा तोंडवळा थोडातरी ओळखता येतो; पण या छायाचित्रात त्यांचा तोंडवळा डागांमुळे ओळखताच येत नाही.

३ इ. छायाचित्र क्र. ३ – मार्च २०१३

त्यानंतर आणखी साधारण ६ मासांनी, म्हणजे मार्च २०१३ मध्ये हे छायाचित्र परत पाहिले असता त्या छायाचित्रामधील डाग अधिक गडद झाल्याचे दिसून आले. तसेच छायाचित्राच्या कडांवरील ओरखडेही वाढल्याचे दिसले.

३ ई. छायाचित्र क्र. ४ – १६.११.२०१७

पुढे साधारण ४ वर्षे ८ मास या कालावधीनंतर हे छायाचित्र परत पाहिले असता त्या छायाचित्रामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या
तोंडवळ्याच्या उजव्या बाजूला प्राण्याचा तोंडवळा दिसून आला

 

४. वाईट शक्तींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रावर आक्रमण करण्याचे कारण

‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्रित असतात’, या अध्यात्मातील सिद्धांताप्रमाणे एखाद्या व्यक्तीची आणि तिच्या छायाचित्राची स्पंदने समान असतात. त्यामुळे वाईट शक्तींनी एखाद्या व्यक्तीच्या छायाचित्रावर आक्रमण केल्यास त्या व्यक्तीवर त्या आक्रमणाचा परिणाम प्रत्यक्षातही होतो. अशा प्रकारे अप्रत्यक्षपणेही आक्रमण करून वाईट शक्ती एखाद्या व्यक्तीला त्रास देऊ शकतात. येथे दिलेल्या छायाचित्रांमध्येही वाईट शक्तींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रावर आक्रमण करून अप्रत्यक्षपणे त्यांच्यावरच आक्रमण केले आहे. वाईट शक्ती किती हुशार आणि आपल्या शक्तीचा काटकसरीने उपयोग करणार्‍या आहेत, हे या आक्रमणांवरून लक्षात येते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रांमध्ये झालेले अशा प्रकारचे अधिकाधिक त्रासदायक पालट आपत्काळाची वाढत चाललेली तीव्रता दर्शवतात.

असुरांनी प्रभु श्रीरामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण या साक्षात् अवतारांनाही त्रास दिला. अवतारांच्या तुलनेत आपण मानव म्हणजे नगण्यच, तरीही या आपत्काळात घाबरायचे कारण नाही; कारण आतापर्यंत जितकी देवासुर युद्धे झाली, त्यांत अंतिमतः जय हा देवता, अवतार आणि देवतांचा पक्ष घेऊन लढणारे यांचा झाला आहे. भक्तांचा कैवार देव घेतोच. त्यामुळे आपण केवळ देवाचा भक्त बनणे आवश्यक आहे !’

– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (१६.८.२०१८)

 

वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांना विनंती !

‘सनातन आश्रम, रामनाथी, गोवा येथे साधकांचे कपडे, वस्तू तसेच साधकांच्या वास्तूतील देवतांची चित्रे आदींवर सूक्ष्मातून झालेली आक्रमणे आणि त्यांमुळे त्यांच्यात झालेले पालट अशा २ सहस्रहून अधिक वस्तू संग्रहामध्ये आहेत. ‘या वस्तूंमध्ये अशा प्रकारे पालट होण्यामागे वैज्ञानिकदृष्ट्या काय कारण आहे ? त्यांचे कोणत्या वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन करता येईल ?’ यासंदर्भात वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्‍यांचे साहाय्य लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.’ – व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(संपर्क : श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, इ-मेल : [email protected])

Leave a Comment