हृदयात सतत देव असल्याची अनुभूती घेणारे संत सूरदास

sant_surdas
संत सूरदास
Arun_dongrey
श्री. अरुण डोंगरे

थोर कृष्णभक्त संत सूरदासांच्या जीवनातील हा प्रसंग आहे. सूरदास अंध होते. एकदा त्यांना रस्त्याच्या पलीकडे जायचे होते. कोण आपल्याला साहाय्य करील ? असा विचार करत असतांना साक्षात् भगवान श्रीकृष्ण एका बालकाच्या रूपात येऊन त्यांना रस्ता ओलांडण्यास साहाय्य करतो आणि रस्ता पार झाल्यावर त्यांच्या हाताला हिसका देऊन निघून जातो. त्या वेळी सूरदासाच्या तोंडातून पुढील ओळी बाहेर पडतात.

हात छुडाकर जायहू, निर्बल जानके मोही ।
हृदयसे जब जायहू, सबल कहोगे तबही ॥

अर्थ : हे देवा, मला दुर्बल समजून तू माझा हात सोडून जात आहेस; पण माझ्या हृदयातून जाऊन दाखव. तेव्हाच मी तुला शक्तीशाली म्हणेन.

पूर्वीच्या काळातील सातत्याने भगवंताच्या अनुसंधानात राहून स्वत: भगवत्मय झालेला सूरदासासारखा महान भक्तच भगवंताला असे आव्हान देऊ शकत होता; पण आजच्या कलियुगातील कधीतरी भगवंताचे अस्तित्व अनुभवणारा सर्वसामान्य साधक भगवंताला कळकळीची प्रार्थना करू इच्छितो, हे श्रीकृष्णा, आता मला सोडून जाऊ नकोस, अशी मी तुला विनंती करतो आणि तुझे पाय धरतो. आता तू नेहमीसाठी माझ्या हृदयातच रहा.

– श्री. अरुण डोंगरे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (११.१.२०१५)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात