सनातन प्रभात हे राष्ट्रजागरण करणारे वृत्तपत्र ! – प.पू. श्री त्र्यंबकेश्वर चैतन्यजी महाराज
दहिवली (जिल्हा पुणे), २० जुलै – सनातन प्रभात हे राष्ट्रजागरण करणारे वृत्तपत्र आहे. सनातन संस्था आणि दैनिक सनातन प्रभात यांच्या माध्यमातून प्रामाणिकपणे साधनारत राहून हिंदु धर्मरक्षणाचे कार्य हातून होत आहे, असे मार्गदर्शन प.पू. श्री त्र्यंबकेश्वर चैतन्यजी महाराज यांनी केले. ते पुढे म्हणाले, हे धर्मकार्य असेच उत्तरोत्तर वाढत रहाणार.