भाव कसा असावा, हे सांगण्यासाठी सनातनच्या साधिकेचे उदाहरण देणारे पुणे येथील समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर !

पुणे येथील समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर गेली २६ वर्षे रामकृष्ण मठात व्याख्यानाच्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रबोधनाचे कार्य करत आहेत. या वर्षी ते करत असलेल्या ज्ञानेश्‍वरीवरील निरुपणाच्या वेळी भगवंताप्रती भाव कसा असतो, हे सांगण्यासाठी त्यांनी दैनिक सनातन प्रभात मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका कवितेचे उदाहरण दिले.

सांगली येथील सनातनच्या साधिका कु. कविता कुलकर्णी यांची येणारा क्षण म्हणजे प.पू. डॉक्टर, जाणारा क्षण म्हणजे प.पू. डॉक्टर, येणारा श्‍वास म्हणजे प.पू. डॉक्टर, गेलेला श्‍वास म्हणजे प.पू. डॉक्टर, येणारा काळ म्हणजे प.पू. डॉक्टर, गेलेला काळ म्हणजे प.पू. डॉक्टर … ही कविता त्यांनी या वेळी वाचून दाखवली. एका कार्यक्रमानिमित्त पू. सुनील चिंचोलकर यांच्याशी भ्रमणभाषवर बोलणे झाले असतांना त्यांनी हा प्रसंग सांगितला. त्या वेळी ईश्‍वराप्रती उत्कट भाव असणारे धन्य ते साधक आणि त्यांना घडवणारी धन्य ती परात्पर गुरुमाऊली असा विचार येऊन कृतज्ञता व्यक्त झाली. तसेच पू. सुनील चिंचोलकर यांच्यातील शिकण्याची वृत्तीही या प्रसंगातून अनुभवता आली.

– प्रा. (कु.) शलाका सहस्रबुद्धे, पुणे

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात