जेवतांना पाळायचे आचार, याविषयी प.पू. पांडे महाराज यांनी केलेले मार्गदर्शन

१. भोजनापूर्वी चित्राहुती का देतात ?

PP_pande_maharaj
प.पू. पांडे महाराज

अन्नापासून मन बनते. मनामुळे संकल्प आणि विकल्प येतात. त्याप्रमाणे कर्म घडते. कर्मापासून चांगल्या किंवा वाईट कृती घडतात. वाईट कर्म आणि चुका घडल्यामुळे पाप घडते. पापामुळे दुःख होते. मृत्यूनंतर आपल्याला यमयातना भोगाव्या लागतात. त्या भोगाव्या लागू नयेत आणि आपण केलेल्या कर्माची फलश्रुती चित्रगुप्त ग्रथित करत असतो. आपल्या मृत्यूनंतर तो यमाकडे हे सर्व ग्रथित करतो. त्यानुसार यम त्याला योग्य न्यायनिवाडा देऊन शिक्षा देतो. या यमयातना चुकवण्यासाठी, याची सतत स्मृती रहावी, यासाठी भोजन (अन्न) ग्रहण करण्यापूर्वी चित्राहुती देण्यात येते.

२. अन्न ग्रहण करतांना मौन पाळण्यास सांगण्यामागील शास्त्र

जेवतांना बोलू नये, असे शास्त्रात सांगितले आहे. जेवतांना बोलल्यामुळे मन बहिर्मुख होते. त्यामुळे आपल्यावरील रज-तमाचा प्रभाव वाढतो; म्हणून मौन व्रत पाळावे. अन्न ग्रहण करता करता भगवंताचे नाम घ्यावे. त्यामुळे त्या अन्नात चैतन्य निर्माण होते. त्यामुळे शक्ती आणि चैतन्य ग्रहण होऊन हवनही होते. हवन होऊन त्यापासून बनणारे मन चांगले बनते. त्या मनापासून सकारात्मक विचार येऊन त्याच्या हातून चांगल्या कृती घडतात. अन्न ग्रहण करतांना भगवंताच्या अनुसंधानात राहून ग्रहण केल्याने चैतन्यशक्तीचा प्रभाव वाढतो आणि त्यामुळे मनात विकल्प येणार नाहीत.

– प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (जून २०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात