भावपूर्ण गुणवर्णनातून शब्दबद्ध केलेल्या पू. (सौ.) अश्विनी पवार !

‘गुरुमाऊलीने पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्या माध्यमातून आम्हाला संतरत्न उपलब्ध करून दिले आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी आम्हा देवद आश्रमातील सर्व साधकांसाठी मिळालेली ही अमूल्य भेट आहे. अध्यात्माच्या वाटेवरून जातांना ‘आध्यात्मिक आई’चे बोट धरण्याची संधी आम्हाला लाभली. यासाठी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे ! ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित असा आम्हा सर्वांना पू. (सौ.) अश्विनी पवार यांचा सर्वच स्तरांवर लाभ करून घेता येऊ दे.

गोस्वामी तुलसीदास यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या वस्तू !

गोस्वामी तुलसीदास (जन्म : वर्ष १५११, देहत्याग : वर्ष १६२३) हे उत्तरप्रदेशातील महान संत होऊन गेले. त्यांना महर्षि वाल्मिकी ऋषि यांचा अवतार मानले जाते. ते रामचरितमानस, अयोध्याकांड, सुंदरकांड इत्यादी महान आध्यात्मिक ग्रंथांचे रचयिते आहेत.

पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांच्या सन्मान सोहळ्यातील भावस्पर्शी क्षण !

पू. (सौ.) अश्‍विनी पवार यांच्या सन्मान सोहळ्यातील भावस्पर्शी क्षण छायाचित्ररूपात प्रसिद्ध करत आहोत.

अंतर्मुखता, साधकांना घडवण्याची तीव्र तळमळ असणार्‍या, तसेच लहान वयात संतपद गाठून ‘मूर्ती लहान; पण कीर्ती महान’ ही म्हण सार्थ ठरवणार्‍या देवद येथील सनातन आश्रमातील पू. (सौ.) अश्‍विनी पवार !

साधकांना साधनामार्गात मार्गदर्शन करणार्‍या, प्रत्येकाचे अंतर्मन जाणून त्याला साहाय्य करणार्‍या, प्रसंगी कठोर होऊन साधकांना घडवणार्‍या आणि साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीची आंतरिक तळमळ असणार्‍या सौ. अश्‍विनी पवार यांनी ७१ टक्के पातळी गाठून संतपद प्राप्त केले !

साधकांना सेवा आणि साधना यांमध्ये साहाय्य करणारे प्रेममूर्ती सद्गुरु सत्यवान कदम !

‘सद्गुरु सत्यवानदादा स्वत:ची सेवा कोणालाही करायला देत नाहीत. पाणी भरणे इत्यादी स्वतःच्या सेवा ते स्वतःच करतात, तसेच इतर कोणत्याही कृती ते सहजतेने करतात.

आदिशक्तीच्या अखंड अनुसंधानात राहून तिचे आज्ञापालन करणारे आणि संतपद गाठलेले मंगळुरू (कर्नाटक) येथील देवीउपासक पू. उदयकुमार !

येथील देवीउपासक श्री. उदयकुमार यांनी संतपद गाठले आहे, असे सनातनचे कर्नाटक राज्य धर्मप्रसारक श्री. रमानंद गौडा यांनी ४ जुलैला येथील सनातनच्या सेवाकेंद्रात झालेल्या भावसोहळ्यात घोषित केले.

साधकांवर प्रेमाची पखरण करणार्‍या सौ. अश्‍विनी पवार ६९ व्या संतपदी विराजमान !

आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी सौ. अश्‍विनी पवार हिने सनातनचे ६९ वे समष्टी संतपद प्राप्त करून सनातनच्या इतिहासात एक अनोखे पर्व निर्माण केले आहे. इतक्या लहान वयातही संत बनता येते, याचे अद्वितीय उदाहरण तिने सर्वांसमोर ठेवले आहे. साधनेत प्रगती होतांना काहीजण बाल्य, वानस्पत्य किंवा पैशाचिक अवस्थेतून पुढे वाटचाल करतात. बाल्यावस्थेतून संतपदापर्यंत कशी वाटचाल होते, हे सौ. अश्‍विनी हिच्या वाटचालीतून आम्हाला अभ्यासता आले. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

विविध प्रसंगांतून प.पू. बाबांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कारणमीमांसेच्या पलीकडे घेऊन जाणे

विविध प्रसंगांतून प.पू. बाबांनी (प.पू. भक्तराज महाराज यांनी) परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कारणमीमांसेच्या पलीकडे घेऊन जाणे, त्याची काही उदाहरणे येथे दिली आहेत.