गुजरातमधील ‘द्वारकाधीश’ मंदिर आणि द्वारकापीठ
श्रीकृष्णाने अवतार समाप्तीच्या आधी समुद्रात द्वारका बुडवली. दुर्वास ॠषींच्या शापामुळे यदुकुळाचा नाश झाला. समुद्रात बुडालेल्या द्वारकेच्या जवळ असलेल्या भूभागाला नंतर द्वारकेचे स्थान प्राप्त झाले !
श्रीकृष्णाने अवतार समाप्तीच्या आधी समुद्रात द्वारका बुडवली. दुर्वास ॠषींच्या शापामुळे यदुकुळाचा नाश झाला. समुद्रात बुडालेल्या द्वारकेच्या जवळ असलेल्या भूभागाला नंतर द्वारकेचे स्थान प्राप्त झाले !
‘वैशाख पौर्णिमेला, म्हणजे १८ मे २०१९ या दिवशी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित सत्संग सोहळ्यात सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी डिगस (तालुका कुडाळ) येथील श्री. बन्सीधर तावडे (वय ७९ वर्षे) हे सनातनच्या ९३ व्या संतपदी विराजमान झाल्याची आनंदवार्ता सर्वांना दिली.
तावडेआजोबा सतत ईश्वरी राज्याच्या विचारांत मग्न असतात. त्यांना भेटायला कोणीही आले की, ते ईश्वरी राज्याविषयी उत्स्फूर्तपणे बोलतात. ‘ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी समाजातील सर्व दुष्प्रवृत्ती नष्ट होणे आवश्यक आहे’, असे त्यांना प्रकर्षाने वाटते. ‘ईश्वरी राज्य यावे’, यासाठी ते सतत प्रार्थना करतात.
योगतज्ञ दादाजींचे पितृवत छत्र लाभणे, ही ईश्वराने सनातनवर केलेली मोठी कृपा असून त्यामुळेच सनातन संस्थेच्या कार्याचा विस्तार होत आहे.
योगतज्ञ दादाजींची सनातनशी भेट होणे, हे ईश्वराचे सुंदर नियोजन असून दिव्य सिद्ध मंत्र आणि योगसामर्थ्य यांमुळे त्यांनी अनेक साधकांच्या प्राणांचे रक्षण केले आहे. त्यांनी सिद्ध केलेले मंत्र, ते स्वतः करत असलेली अनुष्ठाने आणि इतर अनेक दिव्य उपचार यांमुळे साधकांभोवती दिव्य संरक्षक-कवच निर्माण होऊन त्यांच्या आध्यात्मिक त्रासाचे प्रमाण न्यून होत आहे.
गेली अनेक वर्षे कठोर तपःसाधना केलेले योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचा देह अनेक दैवी गुणवैशिष्ट्यांनी विभूषित आहे.
‘आमचे मूळ गाव देवळाली (जि. धाराशिव) होते. यजमान आणि ३ मुले यांसह आम्ही तुळजापूरला आलो. त्या वेळी आमच्याजवळ फार काही साहित्य नव्हते. घरची श्रीमंती होती; पण नातलगांनी आम्हाला काही आर्थिक साहाय्य केले नाही.
पूजेसाठी परडीत काढलेल्या फुलांची सात्त्विक रचना केल्यास त्यातून भावाची स्पंदने निर्माण होऊन पूजा भावपूर्ण होते. कपाळावर कुंकू लावल्याने आचारधर्माचे पालन होते.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी, सनातनच्या साधकांना परमवंदनीय आणि गुरुस्वरूप असणार्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ अन् सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे माता-पिता संतपदी विराजमान झाल्याची शुभवार्ता आश्रमातील एका भावसोहळ्यातून मिळाली.
पिंप्री (जळगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘युवा शौर्यजागरण शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा परिचय आणि कार्य यांची ओळख करून दिली. त्यानंतर ‘स्वरक्षण प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आणि शौर्यजागरण’ या विषयावर मार्गदर्शन केले.