पू. (सौ.) सरिता अरुण पाळंदे यांची पुणे येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

‘पाळंदेकाकू या उत्साही, आनंदी आणि हसतमुख होत्या. त्यांच्या मनात कुणाविषयी प्रतिक्रिया किंवा नकारात्मकता नसायची.

फेसबूकच्या हिंदुद्वेषामागे अमेरिकेतील ‘टाइम’ नियतकालिकाचा हात !

एप्रिल २०२१ मध्ये फेसबूकला यासंदर्भात आम्ही लक्षात आणून दिल्यावरच त्याने हिंदु जनजागृती समिती, सनातन प्रभात, सनातन शॉप, तसेच समितीची अन्य पाने अशा ३० हून अधिक पानांवर बंदी लादली, असा थयथयाट ‘टाइम’ या अमेरिकेतील नियतकालिकाने केला आहे. ९ जून या दिवशी यासंदर्भात टाइमच्या बिली पेरिगो या पत्रकाराचा हिंदुद्वेषी नि पूर्वग्रहदूषित लेख प्रसिद्ध झाला आहे. याद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

सनातनचे १०३ वे संत पू. सदाशिव सामंतआजोबा (वय ८४ वर्षे) यांचा साधनाप्रवास ! – भाग २

‘माहीम येथील कोळीवाड्यात रहात असतांना माझी ओळख मोझेस तालकर याच्याशी झाली. एक दिवस तो मला म्हणाला, ‘‘माझी बहीण वरळी येथील ‘ग्लॅक्सो’ या नामांकित आस्थापनात कामाला आहे.

सनातनचे १०३ वे संत पू. सदाशिव सामंतआजोबा (वय ८४ वर्षे) यांचा साधनाप्रवास ! – भाग १

काही दिवसांनी आम्ही माहीम कोळीवाडा येथे समुद्रकिनारी असलेल्या एका जागेत रहायला आलो. तीही २ खोल्यांची जागा होती. त्या जागेत आम्ही ८ भावंडे आणि आई-वडील रहात होतो. या जागेत माझा दहावीचा (एस्.एस्.सी.चा) निकाला लागला. तेव्हा मी शाळेत पाचवा आलो होतो !

हिंदु राष्ट्राचा अखंड ध्यास असलेले डिगस (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील सनातनचे ९३ वे संत पू. बन्सीधर तावडे आजोबा (वय ८१ वर्षे) यांचा देहत्याग !

पू. तावडेआजोबा हे वर्ष १९९७ पासून सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करत होते. डिसेंबर २०११ मध्ये त्यांनी ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठली होती, तर १८ मे २०१९ या दिवशी त्यांनी संतपद गाठले. त्यांनी तन, मन आणि धन अर्पून गुरुसेवा केली.

अखंड भावावस्थेत असणारे ठाणे येथील सनातनचे १०३ वे संत पू. सदाशिव सामंतआजोबा (वय ८४ वर्षे) यांचा देहत्याग !

वर्ष २०१७ ते वर्ष २०२१ या काळात पू. सदाशिव सामंतआजोबा हे देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास होते. ९ ऑगस्ट २०१९ या दिवशी पू. सामंतआजोबा संतपदी विराजमान झाले होते. आश्रमात ते सनातनच्या सात्त्विक उत्पादनांशी संबंधित सेवा करत.

सनातनची युवा साधिका कु. निधी शंभू गवारे हिचा ‘कलोत्सव २०२१’ यामध्ये सादर केलेल्या नृत्य प्रकारात प्रथम क्रमांक !

‘नेस्पा’ आणि ‘माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय माजी विद्यार्थी संघटना’ यांनी ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्या ‘कलोत्सव २०२१’ मध्ये सनातनची युवा साधिका कु. निधी गवारे हिने नृत्य प्रकारात सहभाग घेतला होता.

हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना आवाहन !

हिंदु जनजागृती समितीने सर्व हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मासाठी कार्य करणार्‍या संघटनांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारे फेसबूकने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता त्यांच्या पानांवर बंदी आणली असेल, तर याची माहिती हिंदु जनजागृती समितीला कळवा.

सनातन संस्थेचे साधक आणि उपकार्यकारी अभियंता श्री. नीलेश नागरे यांना ‘राज्यस्तरीय कोविड योद्धा समाजरक्षक’ महासन्मान !

अखिल महाराष्ट्र पत्रकार आणि पत्रलेखक संघ अन् विश्‍वात्मक मराठी साहित्य परिषद यांच्या वतीने सनातन संस्थेचे साधक आणि उपकार्यकारी अभियंता श्री. नीलेश नागरे यांना ‘राज्यस्तरीय कोविड योद्धा समाजरक्षक महासन्मान २०२१’ने सन्मानित करण्यात आले. नाशिक झोनमध्ये नगर मंडळ कार्यालयांतर्गत श्रीरामपूर विभागात उपकार्यकारी अभियंता म्हणून श्री. नीलेश नागरे कार्यरत आहेत.

भीषण काळात जिवंत रहाण्यासाठी ईश्वरी कृपा असणे आवश्यक ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

ईश्वर भक्त आणि साधना करणारे यांच्यावर कृपा करतो. गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले आहे, ‘न मे भक्त: प्रणश्यति ।’ म्हणजे माझ्या भक्तांचा नाश होत नाही. ईश्वराची कृपा मिळवायची असेल, तर धर्मशिक्षण घेऊन साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.