श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी शेषनागाच्या फुंकरीतून निर्माण झालेल्या ‘मणिकर्ण तप्तकुंड’ (जिल्हा कुलु) या स्थानाला दिलेली भेट !
देवभूमी हिमाचल प्रदेश येथे कुल्लु नावाचे नगर आहे. या नगराच्या चारही दिशांना अनेक दैवी स्थाने आहेत. ‘कुल्लु’ म्हणजे पूर्वीच्या काळातील ‘कुलांतपीठ !’ जेथे मनुष्यकुळ संपते आणि देवकुळ चालू होते, म्हणजेच जे देवतांचे निवासस्थान आहे, ते म्हणजे ‘कुलांतपीठ !’ अशा कुलु प्रदेशात ‘मणिकर्ण’ नावाचे स्थान आहे.