औषधी वनस्पतींच्या लागवडीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञांची आवश्यकता

भावी भीषण आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने विविध जिल्ह्यांत औषधी वनस्पतींची लागवड चालू आहे. साधक घरोघरी कुंड्यांमध्ये औषधी वनस्पतींची लागवड करत आहेत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिदा सिंगबाळ यांच्यातील दिव्यत्वाची माहिती देणारे आधुनिक वैज्ञानिक संशोधन आणि त्यांच्याविषयी देवीने दिलेले ज्ञान !

विद्याचौडेश्वरी देवीच्या आज्ञेवरून यांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या गळ्यात विष्णु (राम) तुळशीचा हार घातला. तेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना उद्देशून देवी म्हणाली, ‘‘तुम्ही आता साक्षात् गौरी स्वरूपात दिसत आहात.

देहली येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने श्रावण सोमवार, कावड यात्रा आणि नागपंचमी आदी सणांविषयी ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन !

संस्थेच्या सौ. राजरानी साहू यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये जिज्ञासूंसाठी श्रावण सोमवार, कावड यात्रा, तसेच ‘श्रावण मासामध्ये भगवान शिवाची उपासना का करतात ?’ यांविषयीची माहिती सांगितली. सौ. संगीता गुप्ता यांनी ‘नागपंचमीचे पूजन कसे करावे ?, नागदेवतेला प्रार्थना कशी करावी ?’ यांविषयीची माहिती सांगितली.

सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने म्हणजे समाजाची सात्त्विकता वाढवणारे चैतन्याचे स्रोत ! – वैद्या (सौ.) प्रियाताई शिंदे

सनातनचे कुंकू हे मी स्वत: दैनंदिन उपयोगात आणते. मी घरामध्ये नियमित अग्निहोत्र करते आणि त्यासाठी सनातननिर्मित भीमसेनी कापराचा उपयोग करते. कोरोना काळातही भीमसेनी कापराचा चांगला उपयोग झाला. सनातनची उत्पादने या केवळ वस्तू नसून त्या समाजाची सात्त्विकता वाढवणारे चैतन्याचे स्रोत आहेत, असे गौरवोद्गार कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या सुविद्य पत्नी वैद्या (सौ.) प्रियाताई शिंदे यांनी काढले.

जगप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य, तसेच ‘योग आणि संगीतोपचार’ विषयांतील तज्ञ वैद्य बालाजी तांबे यांचे निधन !

पाच दशके त्यांनी ‘आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीतोपचार’ यांचा प्रचार अन् प्रसार केला. त्यांनी समाजातील अनेक घटकांना आयुर्वेदाशी जोडले. आयुर्वेद केवळ राज्य किंवा देश यांपुरते मर्यादित न ठेवता त्यांनी जगभरात त्याचा प्रसार केला

हिंदी महासागरातील तापमानवाढीमुळे भारतात पूरस्थिती निर्माण होणार ! – संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

संयुक्त राष्ट्रांच्या ‘इंटरगव्हर्नमेन्टल पॅनेल ऑन क्लायमेट चेन्ज’चा (‘आय.पी.सी.सी.’चा) ६ वा अहवाल ‘क्लायमेट चेंज २०२१ – दी फिजिकल सायन्स बेसिस’ प्रसिद्ध करण्यात आला. त्यात भारताविषयी चेतावणी देतांना हिंदी महासागराच्या तापमानवाढीमुळे समुद्रपातळीत वाढ होऊन किनारपट्टीच्या सखल भागांमध्ये वारंवार तीव्र पूरपरिस्थिती उद्भवेल, असे म्हटले आहे.

जमशेदपूर (झारखंड) येथे वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये सनातन संस्थेचा सहभाग !

या प्रसंगी मंदिराचे प्रमुख कार्यकर्ते श्री. राजन गोराई म्हणाले, ‘‘वृक्षारोपणासारखे महान कार्य अन्य प्रतिष्ठित लोकांकडून करण्यापेक्षा सनातनच्या साधकांकडूनच करावे, असे मला वाटले.’’

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

‘प्रपंच केला, तरी मनस्ताप आहे आणि परमार्थ केला, तर मनस्ताप अधिक आहे; परंतु परमार्थ केल्याचे फळ मेल्यावर मिळते. जीव चांगल्या मार्गाला, देवांना भेटायला जातो आणि मुक्त होतो. जन्म-मृत्यूचे ८४ लक्ष फेरे चुकवतो.’

चिपळूणचा महापूर आपत्काळाच्या दाहकतेची झलक !

पुरात अडकलेल्या आणि जिवावर बेतलेल्या कुणालाही प्रशिक्षित यंत्रणेकडून साहाय्य मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. याचा सरळ अर्थ असा आहे की, आपल्यालाच आपल्या जीवितरक्षणासाठी झगडावे लागणार असून त्यासाठी स्वतःचे मनोबल आणि आत्मबळ अन् ईश्वरावरील श्रद्धा, हेच एकमात्र साधन आहे.