देहली – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने देहली येथील श्रावण सोमवार, कावड यात्रा आणि नागपंचमी या सणांविषयी नुकतेच ‘ऑनलाईन’ प्रवचन घेण्यात आले. या वेळी संस्थेच्या सौ. राजरानी साहू यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये जिज्ञासूंसाठी श्रावण सोमवार, कावड यात्रा, तसेच ‘श्रावण मासामध्ये भगवान शिवाची उपासना का करतात ?’ यांविषयीची माहिती सांगितली. सौ. संगीता गुप्ता यांनी ‘नागपंचमीचे पूजन कसे करावे ?, नागदेवतेला प्रार्थना कशी करावी ?’ यांविषयीची माहिती सांगितली. सौ. गुप्ता यांनी नागपंचमीविषयी असलेल्या शंकांचे निरसन केले. सत्संगामध्ये सांगितलेली माहिती सर्वांना अतिशय आवडली. देहली आणि एन्सीआर् येथील जिज्ञासूंनी या सत्संगाचा लाभ घेतला.

फरीदाबाद (हरियाणा) येथे नवरात्रोत्सवात सनातन संस्था आयोजित व्याख्याने आणि ग्रंथप्रदर्शन यांना उत्स्फूर्त प्रतिसाद
हिंदूंनी नवरात्रात केवळ ९ दिवस देवीचा जागर न करता वर्षभर देवीची उपासना करावी ! –...
‘सेवाज्ञ फाऊंडेशन’च्या ‘युवा धर्म संसद’मध्ये सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन ठरले विशेष आकर्षण !
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्या पत्नी सौ. अमिता चव्हाण यांच्याकडून सनातन...
विविध मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला अवश्य भेट द्या !
सनातन संस्थेच्या गुरुकार्य गुणवृद्धी आणि नवचेतना राष्ट्रीय शिबिराला भावपूर्ण वातावरणात आरंभ !