श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिदा सिंगबाळ यांच्यातील दिव्यत्वाची माहिती देणारे आधुनिक वैज्ञानिक संशोधन आणि त्यांच्याविषयी देवीने दिलेले ज्ञान !

कर्नाटकमधील तुमकुरू जिल्ह्यातील ‘चिक्कनायकनहळ्ळी’ गावातील मद्दरलक्कमादेवी

 

१. देवी आणि महर्षि यांनी
श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यात भूदेवीचा अंश असल्याचे सांगणे

१ अ. श्री विद्याचौडेश्वरी देवीने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यात भूदेवीचा अंश असल्याचे सांगणे

‘श्री विद्याचौडेश्वरी देवीच्या आज्ञेवरून यांनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या गळ्यात विष्णु (राम) तुळशीचा हार घातला. तेव्हा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना उद्देशून देवी म्हणाली, ‘‘तुम्ही आता साक्षात् गौरी स्वरूपात दिसत आहात.’’ श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या गळ्यात विष्णु तुळशीचा हार घालण्याचे कारण सांगतांना स्वामीजींच्या माध्यमातून देवी म्हणाली, ‘‘आपण साक्षात् भूदेवीचा अंश आहात. भूदेवी ही ‘विष्णुप्रिया’ आहे. वैकुंठलोकात शेषनागावर पहुडलेल्या विष्णूच्या चरणांजवळ भूदेवी असते. तुळस ही श्रीविष्णूला प्रिय आहे; म्हणून मी विष्णुप्रियेला श्रीविष्णूची प्रिय वस्तू भेट देत आहे.’’

कर्नाटकमधील तुमकुरू जिल्ह्यातील हंगरहळ्ळी गावातील श्री विद्याचौडेश्वरीदेवी

१ आ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांचा स्पर्श जमिनीवर
जेथे होतो, तेथे ‘सूक्ष्म अनिल’ (सूक्ष्म वायू) तयार होत असल्याचे श्री विद्याचौडेश्वरी देवीने सांगणे

‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यात भूदेवीचा अंश असल्यामुळे त्यांच्या चरणांचा स्पर्श जमिनीवर जेथे होतो, तेथे ‘सूक्ष्म अनिल’ (सूक्ष्म वायू) तयार होतो. ही एक दैवी साक्षच आहे’, असे देवीने स्वामीजींच्या माध्यमातून सांगितले.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१ इ. पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सप्तर्षींनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यामध्ये भूदेवीतत्त्व, तसेच श्री महालक्ष्मीतत्त्व असल्याचे सांगितले आहे. (संदर्भ : सप्तर्षी जीवनाडीपट्टीवाचन क्र. १४४-१४५)

१ ई. कर्नाटक येथील तुमकुरू जिल्ह्यातील ‘चिक्कनायकनहळ्ळी’ गावातील मद्दरलक्कमा (श्री महालक्ष्मी) या देवीने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्यामध्ये श्री महालक्ष्मी तत्त्व असल्याचे सांगितले आहे.

 

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या तोंडवळ्यावरील घाम आणि
चरणांतून निघणारे द्रव यांच्याशी संबंधित घटकांमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळणे

चरणांतून निघालेले दैवी द्रव

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणातून निघालेला दैवी द्रव. त्यांच्या डाव्या चरणापेक्षा त्यांच्या उजव्या चरणातून निघालेले द्रव, तसेच त्यांच्या डाव्या चरणाच्या ठश्यापेक्षा त्यांच्या उजव्या चरणाच्या ठश्यात सकारात्मक ऊर्जा अधिक आहे.

आश्रमात २५.३.२०१९ या दिवशी ५४ वा पंचमुखी हनुमत्कवच याग, ३१.३.२०१९ या दिवशी ५५ वा पंचमुखी हनुमत्कवच याग आणि ७.४.२०१९ या दिवशी सौरयाग करण्यात आले. या तिन्ही यज्ञांच्या पूर्णाहुतीच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांतून पाण्यासारखे द्रव वाढीव प्रमाणात बाहेर पडले.

२ अ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांतून निघणारा द्रव सिद्ध होण्याची प्रक्रिया

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांच्या भूमीला होणार्‍या स्पर्शामुळे त्यांचे चरण आणि भूमी यांच्यामधील वायुमंडलात सूक्ष्म वायूची निर्मिती होते. या वायूचे बाष्पीभवन होऊन त्याचे जलामध्ये रूपांतर होते. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांतून बाहेर पडणारे द्रव म्हणजे हे जल होय.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांचे तळवे. संतांच्या चरणांतून सर्वाधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होते. अन्य घटकांच्या तुलनेत श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांशी संबंधित घटकांमध्ये अधिक सकारात्मक ऊर्जा आहे.

२ आ. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ या आधुनिक वैज्ञानिक यंत्राद्वारे केलेला अभ्यास

भूतपूर्व अणूवैज्ञानिक डॉ. मन्नम् मूर्ती यांनी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यू.ए.एस्.) हे उपकरण विकसित केले आहे. या उपकरणाच्या माध्यमातून एखादी वस्तू, वास्तू, वनस्पती, प्राणी किंवा मनुष्य यांतील सूक्ष्म सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा यांची प्रभावळ मोजता येते. सर्वसाधारण व्यक्ती किंवा वस्तू यांत नकारात्मक ऊर्जा असू शकते; परंतु सकारात्मक ऊर्जा असेलच, असे नाही. वर्ष २०१४ ते २०१९ या कालावधीमध्ये ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाच्या माध्यमातून व्यापक संशोधन करण्यात आले आहे. या कालावधीमध्ये १० सहस्रपेक्षा अधिक सजीव आणि निर्जीव घटकांच्या मोजण्यांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.

उपरोल्लेखित तिन्ही यज्ञांच्या पूर्णाहुतीच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांतून बाहेर पडणारे द्रव, तसेच त्यांच्या तोंडवळ्यावरील घाम यांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निष्कर्ष आणि त्यांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

२ आ १. यज्ञांच्या पूर्णाहुतीच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या पावलांतून निघणार्‍या द्रवाशी संबंधित घटकांच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ

२ आ १ अ. तिन्ही यागानंतर (५५ वा पंचमुखी हनुमत्कवच याग आणि सौरयाग) श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या तोंडवळ्यावरील घाम आणि घाम टिपलेला कापूस यांमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळली.
कु. प्रियांका लोटलीकर

अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ या ‘सद्गुरु’ पदावरील संत असल्याने त्यांच्यामध्ये पुष्कळ चैतन्य आहे. त्यांच्या चैतन्यमय देहातून वातावरणात सतत चैतन्याचे प्रक्षेपण होते. त्यांच्या देहातून बाहेर पडणार्‍या घामातही चैतन्य असल्याने त्यांचा घाम आणि घाम टिपलेला कापूस यांमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळली.

२ आ १ आ. तिन्ही यागांनंतर त्यांच्या चरणांतून निघणारे द्रव, तसेच चरणांचे कागदांवर घेतलेले ठसे आणि द्रव टिपलेले कापूस या संबंधित घटकांमधील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत लक्षणीय वाढ झाली.

अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण : संतांच्या चरणांतून सर्वाधिक प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होते. त्यामुळे अन्य घटकांच्या तुलनेत सद्गुरु बिंदाताई यांच्या चरणांशी संबंधित घटकांमध्ये अधिक सकारात्मक ऊर्जा आहे. ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांतून निघणार्‍या द्रवामध्ये, तसेच चरणांच्या कागदांवर घेतलेले ठसे आणि अन् द्रव टिपलेले कापूस या संबंधित घटकांमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळणे, तसेच तिन्ही यागांच्या वेळी त्यात उत्तरोत्तर लक्षणीय वाढ होणे’, हे त्यांच्यातील श्री महालक्ष्मी तत्त्व अधिकाधिक प्रमाणात कार्यरत होत असल्याचे द्योतक आहे.

– कु. प्रियांका लोटलीकर, संशोधन समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

 

मुंबईतील ‘आय.आय.टी.’ या प्रख्यात आस्थापनाच्या
प्रयोगशाळेतील चाचणीतूनही चरणांतून निघणार्‍या द्रवाचे दिव्यत्व स्पष्ट होणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांतून निघणारे द्रव, तसेच तोंडवळ्यावरील घाम यांचे नमुने मुंबईतील ‘आय.आय.टी.’ या प्रख्यात आस्थापनाच्या प्रयोगशाळेत वैज्ञानिक तपासणीसाठी देण्यात आले. त्या नमुन्यांसोबत त्याच यागाच्या वेळी एका साधकाला आलेल्या घामाचेही नमुने पाठवण्यात आले. ‘आय.आय.टी.’ मधील चाचणीतून दिसून आले की, साधकाच्या घामाच्या नमुन्यांमध्ये सामान्य व्यक्तींच्या घामामध्ये जे क्षार ज्या प्रमाणात आढळतात, तसेच होते; परंतु श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांतून निघालेल्या द्रवातील, तसेच तोंडावळ्यावरील घामाच्या नमुन्यांमध्ये सर्व क्षारांचे प्रमाण सामान्य व्यक्तींच्या तुलनेत १/१० एवढे अल्प होते. यावरूनही तो द्रव ‘घाम’ नसून ‘दैवी’ असल्याचे स्पष्ट होते.’

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment