महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने मध्यप्रदेश आणि राजस्थान येथे ग्रंथप्रदर्शन अन् विविध माध्यमांतून करण्यात आला धर्मप्रसार !

एका शिव मंदिरामधील पुजारी श्री. कालुदासजी वैष्णव म्हणाले, ‘‘अनेक लोकांना भगवान शिवाशी संबंधित पूजेविषयी माहिती नाही. तुम्ही हे भित्तीपत्रक लावून फार चांगले कार्य केले.’’

फरिदाबाद (हरियाणा) येथे महाशिवरात्रीनिमित्त प्रवचन आणि ग्रंथप्रदर्शन यांना जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

या वेळी शिवाच्या उपासनेचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व, शास्त्राप्रमाणे शिवाचे पूजन कसे करावे ?, ‘ॐ नम: शिवाय ।’ नामजप करण्याचे लाभ, तसेच कुलदेवता आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ नामजप का करावा ? यांविषयी माहिती दिली.

डोंबिवली येथील सनातन संस्थेच्या साधिका श्रीमती अमृता संभूस यांचा महिलादिनानिमित्त शिवसेनेच्या वतीने सत्कार !

सनातन संस्थेच्या डोंबिवली पूर्व येथील साधिका श्रीमती अमृता संभूस यांचा शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्री. राजेश मोरे यांनी सत्कार केला.

फरिदाबाद (हरियाणा) येथे महाशिवरात्रीनिमित्त प्रवचन आणि ग्रंथप्रदर्शन यांना जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

फरिदाबाद (हरियाणा) महाशिवरात्रीच्या निमित्ताने २२ फेब्रुवारी या दिवशी सनातनच्या पूनम अरोडा यांनी येथील पिंपलेश्वर मंदिरामध्ये येणार्‍या भाविकांना शिव उपासनेविषयी मार्गदर्शन केले.

‘रोटरॅक्ट क्लब ऑफ कृष्णा व्हॅली’चे माजी अध्यक्ष किर्ती भगवानदास पटेल यांच्याकडून कै. ग.रा. पुरोहित कन्या प्रशालेस सनातनची ग्रंथसंपदा भेट !

सनातन संस्थेचे हितचिंतक, तसेच ‘रोटरॅक्ट क्लब ऑफ कृष्णा व्हॅली’चे माजी अध्यक्ष श्री. किर्ती भगवानदास पटेल यांच्याकडून कै. ग.रा. पुरोहित कन्या प्रशालेस विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील, असे ग्रंथ भेट देण्यात आले. हे ग्रंथ शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती श्रद्धा सुनील केतकर यांनी स्वीकारले.

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील तत्त्वनिष्ठ आणि झोकून देऊन सेवा करणार्‍या पू. (सुश्री (कु.)) रत्नमाला दळवी (वय ४४ वर्षे) यांच्या सन्मान सोहळ्याचा भाववृत्तांत !

पू. सुश्री (कु.) रत्नमाला यांच्यातील सेवाभावी वृत्ती अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. अनेक शारीरिक त्रास होत असतांनाही त्या भावपूर्ण, परिपूर्ण आणि ईश्वराच्या अनुसंधानात राहून सेवा करतात. त्या सध्या देवद आश्रमात सेवा करत आहेत. ‘दिसेल ते कर्तव्य’ असा त्यांचा भाव असून आश्रमातील अन्य सेवाही त्या पुढाकार घेऊन करतात. ‘आधी केले, मग सांगितले’, ही उक्ती त्यांच्याबाबत सार्थ ठरते.

सनातन संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्त व्याख्यान – ‘जागर स्त्रीशक्तीचा !’

भारताला शूर, लढवय्या अशा क्रांतीकारक महिलांचा मोठा वारसा लाभला आहे. आपल्या माता-भगिनींमधील शौर्य जागृत झाल्यावरच खर्‍या अर्थाने महिला सबलीकरण होऊ शकते. शौर्यजागरणासाठी आणि महिलांवर होणार्‍या अत्याचारांना रोखण्यासाठी आता महिलांनी स्वत: प्रशिक्षण घेऊन स्वरक्षणासाठी सक्षम व्हायला हवे,

मारियुपोल (युक्रेन) येथे अन्न-पाण्यासाठी नागरिकांकडून एकमेकांवर होत आहेत आक्रमणे !

मारियुपोलमधल्या एका रुग्णालयावर केलेल्या आक्रमणात ६ वर्षांच्या मुलीसह ३ जण ठार झाले आहेत. या शहराला वेढा घालण्यात आल्याने अन्न, पाणी आणि वीज यांच्याविना नागरिकांना दिवस काढावे लागत आहेत. या भागात कडाक्याची थंडी असून अशा थंडीमध्ये अन्न-पाण्याखेरीज दिवस काढणे युक्रेनी नागरिकांसाठी अवघड बनले आहे.

आजच्या युगात यशस्वी होण्यासाठी महिलांनी आध्यात्मिक स्तरांवरही प्रयत्न करणे आवश्यक ! – वैद्या (श्रीमती) मृणालिनी भोसले

महिला हे शक्तीचे रूप आहे; पण त्याची जाणीव आजच्या महिलांना करून देणे आवश्यक आहे. आजच्या युगात यशस्वी होण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवरही प्रयत्न करणे आवश्यक आहे.