सनातनच्या ‘घरोघरी लागवड’ मोहिमेच्या अंतर्गत पुणे जिल्ह्यातील साधकांनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न !

भावी भीषण आपत्काळाची पूर्वसिद्धता म्हणून वर्ष २०२१ च्या कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर सनातनने घरोघरी लागवड मोहीम चालू केली. या अंतर्गत साधकांना घरच्या घरी भाजीपाला आणि औषधी वनस्पती यांची लागवड करण्याविषयी प्रबोधन करण्यात आले. २०२२ च्या कार्तिकी एकादशीला या मोहिमेला १ वर्ष पूर्ण झाला. या निमित्त पुण्यातील साधकांनी वर्षभरात केलेले प्रयत्न पाहू.

भाज्यांची उन्हाची आवश्यकता

बर्‍याचदा सर्वांनाच, त्यांतही नवीन बागकर्मींना काही प्रश्न नेहमी पडत असतात अन् ते म्हणजे ‘कुठल्या भाज्यांना किती ऊन लागते ? भाज्यांच्या पेरणी ते काढणी या संपूर्ण जीवनचक्रात त्यांची उन्हाची आवश्यकता काय असते अन् आपल्याकडे उपलब्ध असलेल्या उन्हात, मग ते थेट ऊन असो किंवा सूर्यप्रकाश, आपण कोणकोणत्या भाज्या घेऊ शकतो ?’ या प्रश्नांची उत्तरे देणारा हा लेख !