
सांगली – येथील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचक आणि सनातन संस्थेच्या हितचिंतक सौ. मिनाक्षी जोग यांनी सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित केलेल्या सुसंस्कार मालिकेचे २ संच (१४ ग्रंथ) पुणे येथील ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयास भेट दिले. हे ग्रंथ सौ. मिनाक्षी जोग यांचा इयत्ता ४ मधील नातू कु. चैतन्य अभिजीत जोगळेकर (वय ११ वर्षे) याच्याकडून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मंजुषा खेडकर यांनी स्वीकारले. या वेळी शाळेचे पर्यवेक्षक श्री. विकास डिग्रजकर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करणारी ही अमूल्य ग्रंथसंपदा शाळेस भेट दिल्याविषयी मुख्याध्यापिका सौ. मंजुषा खेडकर यांनी सौ. मीनाक्षी जोग यांचे आभारपत्र देऊन धन्यवाद व्यक्त केले आहेत.
श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने सनातनने प्रकाशित केलेले गणपतीविषयीचे ग्रंथ, लघुग्रंथ, चित्रे अन् नामजप-पट्ट्या समाजापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न...
धर्मशास्त्रानुसार यंदा ‘रक्षाबंधन’ नेमक्या कोणत्या वेळेत करावे ?
श्रावण मासात अध्यात्मप्रसाराच्या दृष्टीने पुढील प्रयत्न करून गुरुकृपा संपादन करा !
‘सनातन’चे साधक-हितचिंतक यांच्या ‘सोशल मिडिया पोस्ट’संदर्भात सनातन संस्थेची भूमिका !
छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्य सरकार सनातन संस्थेला साहाय्य करणार ! – मुख्यमंत्री...
सनातन संस्थेच्या नावाने येणार्या फसव्या ई मेलपासून सावध रहा !