संकष्टनाशन स्तोत्र

श्री गणपति Ganpati
श्री गणपति

‘स्तोत्र’ याविषयी थोडे समजून घेऊया. ‘स्तोत्र’ म्हणजे देवतेचे स्तवन, म्हणजेच देवतेची स्तुती होय. स्तोत्रपठण केल्याने पठण करणार्‍या व्यक्‍तीभोवती सूक्ष्म स्तरावरील संरक्षककवच निर्माण होऊन तिचे अनिष्ट शक्‍तींपासून रक्षण होते. ज्या वेळी ठराविक लयीत अन् सुरात एखादे स्तोत्र म्हटले जाते, त्या वेळी त्या स्तोत्रातून एक विशिष्ट चैतन्यदायी शक्‍ती निर्माण होते. याकरता स्तोत्र एका विशिष्ट लयीत म्हणणे आवश्यक आहे.

श्री गणेशाची दोन स्तोत्रे सर्वपरिचित आहेत. त्यांपैकी एक म्हणजे ‘संकष्टनाशन स्तोत्र’. हे स्तोत्र नित्यपठणास अतिशय सोपे अन् प्रभावी आहे. या स्तोत्राची रचना देवर्षी नारद यांनी केली आहे. यात श्री गणेशाच्या बारा नावांचे स्मरण केले आहे. या स्तोत्राचे पठण सकाळी, माध्यान्ही आणि सायंकाळी केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. ‘अशा पद्धतीने आपणासही योग्य उच्चारांसह संकष्टनाशन स्तोत्राचे भावपूर्ण पठण करता येवो आणि इच्छित फलप्राप्ती होवो’, अशी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना आहे.

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्
भक्तावासं स्मरेनित्यम आयुष्कामार्थ सिध्दये ॥१॥

प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम्
तृतीयं कृष्णपिङगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम ॥२॥

लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धुम्रवर्णं तथाषष्टम ॥३॥

नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम्
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ॥४॥

द्वादशेतानि नामानि त्रिसंध्यं य: पठेन्नर:
न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दीकर प्रभो ॥५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्
पुत्रार्थी लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम ॥६॥

जपेद्गणपतिस्तोत्रं षडभिर्मासे फलं लभेत्
संवत्सरेण सिध्दीं च लभते नात्र संशय: ॥७॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा य: समर्पयेत
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥८॥

Leave a Comment