१. श्रीकृष्णासमवेत केलेल्या दैनंदिन कृती दर्शवणारी भावपूर्ण चित्रे

श्रीकृष्णाने नवजात अर्भकाचे स्वागत करणे : कर्म, ध्यान, ज्ञान आणि भक्ती अशा कोणत्याही मार्गाने साधना करणार्‍या साधकाला नवजात बाळाप्रमाणे परमहंस अवस्था प्राप्त केल्याविना मोक्ष मिळत नाही.

श्रीकृष्णाने त्याच्या बाललीलेच्या गोष्टींचे कथन करत दहीभात भरवणे : बाळ-कृष्णाने यशोदामातेला स्वतःच्या मुखात संपूर्ण ब्रह्मांडाचे दर्शन घडवले होते. या आपल्या बाललीलेचे कथन करत श्रीकृष्ण साधिकेला दहीभात भरवत आहे.

मानसपूजा करणे : मी फार लहान असल्याने षोडषोपचार पूजा करू शकत नाही, तरीसुद्धा माझ्या ईश्वराची पूजा मला करायची असल्याने मी ती मानसरित्या केली.

श्रीकृष्णाच्या शेल्याला घट्ट धरून त्याच्या खांद्यावर झोपणे : माता-पिता, सखा, सर्वकाही असलेल्या श्रीकृष्णाच्या कोमल शेल्याला घट्ट धरून सर्व काही त्याच्याचरणी आधीन करून, तोच माझे रक्षण करणार आहे या दृढ श्रद्धेने साधिका झोपली आहे.

साक्षात् श्रीकृष्णाने बालिकेला बालगोपीप्रमाणे सजवणे : प्रीतीच्या गोडीने भरलेल्या, प्रेमरसशृंगाराने नटलेल्या आणि श्रीकृष्णाच्या मधुर मीलनासाठी आसुसलेल्या शुद्धतम मधुराभक्तीमय परमकृष्णसौंदर्याने श्रीकृष्ण बालगोपीला सजवत आहे.

श्रीकृष्णाच्या मांडीवर बसून झोका घेणे : फुलपाखरू हवेतून उडते, म्हणजे त्याच्यात जो हलकेपणा असतो, तोच हलकेपणा श्रीकृष्णासमवेत झोका खेळतांना बालकभावातील साधिकेला प्राप्त झाला आहे.

यमुना नदीत भगवान श्रीकृष्णासमवेत जलक्रीडा करणे : बालकभावाच्या निर्मळ अंतःकरणातील भक्तीरसात डुंबणार्‍या जीवात्म्यावर प्रसन्न होऊन भगवंत चैतन्यरूपाने प्रगटतो आणि कृपाजलाचे चैतन्यमय तुषार उडवून त्याच्या आनंदात सहभागी होतो.

श्रीकृष्णासमवेत नृत्य करणे : सभोवतीचे लोक, परिस्थिती आणि देहभान हे सर्व विसरून मी माझ्या ईश्वरासमवेत नृत्य करत आहे.

श्रीकृष्णाशी लपंडाव खेळणे : साधना करत असतांना भगवंत योगमायेच्या साहाय्याने साधक-जिवावर सात्त्विक मायेचा पडदा टाकून लपंडावाचा खेळ खेळत असतो. गुरूंच्या मायेमुळे योगमायेचा सात्त्विक पडदा दूर सारला जाऊन भगवंताचे दर्शन होते.

श्रीकृष्णाने स्वतःकडे लक्ष द्यावे, यासाठी बालसाधिकेने रुसल्याचे नाटक करणे आणि : श्रीकृष्णाने लाडीगोडी करत स्वतःचे सुदर्शनचक्र अन् पांचजन्य शंख देऊन तिची समजूत घालणे


1396803048_Umakka_1_lekh5_Icon१. श्रीकृष्णासमवेत केलेल्या दैनंदिन कृती दर्शवणारी भावपूर्ण चित्रे

ईश्वर किंवा गुरु यांच्या अस्तित्वाची कोणत्याही स्वरूपातील जाणीव उत्कटतेने असणे, त्या जाणिवेच्या पोटी श्रीकृष्णासमवेत केलेल्या जीवनातील दैनंदिन कृती.

1397062426_Umakka_1_lekh3_125२. साधनेतील प्रयत्नांमधून श्रीकृष्णाने दिलेल्या अनुभूती दर्शवणारी चित्रे

स्थुलातून श्रीकृष्ण जरी काहीही करतांना दिसत नसला, तरी सूक्ष्मातून प्रत्येकात वास करून तोच सर्व कर्म करत आहे.

1397119543_Umakka_2_lekh2_125३. भगवान श्रीकृष्णाची शिकवण दर्शवणारी चित्रे

ईश्वर भक्तांसाठी सूक्ष्मातीसूक्ष्म अशा निर्गुण स्वरूपातून मंत्रमुग्ध करणार्‍या आणि सहज ओळखू शकणार्‍या सगुण रूपात अवतीर्ण होणे.

1397124860_Umakka_2_lekh4_125४. ईश्वराचे समष्टी कार्य दर्शवणारी चित्रे

न मे भक्तः प्रणश्यति ।’ म्हणजे ‘माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही.’या वचना प्रमाणे ईश्वर विविध माध्यमातून भक्तांचे रक्षण करणे.

1397211199_Umakka_2_lekh6_125५. कोणतीही सेवा श्रीकृष्णाच्या कृपेने होत असल्याच्या अनुभूती दर्शवणारी चित्रे

संगणकावर सेवा करतांना, चित्र काढतांना, प्रसार करतांना, अनोळखी व्यक्तींना सामोरे जातांना, प्रवचन करतांना श्रीकृष्णाच्या कृपेने होत असणे.

1397237243_Umakka_2_lekh15_125६. सनातनमधील काही आनंददायक घटना दर्शवणारी चित्रे

सनातनच्या साधकांना दैवी कण आढळणे, साधकांना संत बनवणे यांसारख्या दिव्य उपहारांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण साधकांवर कृपेचा वर्षाव करणे.

1397240169_Umakka_2_lekh13_125७. प.पू. डॉक्टरांच्या संदर्भातील अनुभूती दर्शवणारी चित्रे

प.पू. डॉक्टरांच्या संदर्भात उमगलेले अवतार-रहस्य आणि श्रीकृष्णाप्रमाणे मधुराधिपती, जगन्माता, जगत्पिता असणार्‍या प.पू. डॉक्टरांची मधुर आठवण.

1418566858_P_Yoyatai_icon2८. पू. (सौ.) योया वाले यांनी रेखाटलेली श्रीकृष्णाच्या अस्तित्वाची अनुभूती देणारी भावचित्रे

भगवान श्रीकृष्णाप्रती असलेल्या अत्युच्च भावामुळे पू. (सौ.) योया वाले यांना विविध भावचित्रे स्फुरली आहेत.