४. ईश्वराचे समष्टी कार्यदर्शवणारी चित्रे

मन, बुद्धी आणि अहं व्यापणारी ईश्वराची तीन पावले ! : ‘हे ईश्वरा, ज्या प्रमाणे तू स्वर्गलोक, भूलोक आणि पाताळ व्यापून टाकले आहेस, त्याप्रमाणे माझे मन, बुद्धी आणि अहं यांनाही तू व्यापून टाक, ही प्रार्थना वाचून भगवान श्रीकृष्णाने साधिकेला हे चित्र रेखाटण्याची प्रेरणा दिली.’

ईश्वराच्या कृपेमुळे साधकांनी आरंभलेले कलियुगातील समुद्रमंथन : साधकांच्या माध्यमातून श्रीकृष्णच वासुकी नागाच्या दोन्ही बाजूला उभे राहून नागाची दोन्ही टोके ओढत आहे. साधकांच्या चित्तसमुद्राचे मंथन करून अहंकार, दोष आणि अज्ञान यांची मलीनता हलाहल विषाच्या रूपाने चित्तसमुद्रातून बाहेर पडते.

द्रौपदीच्या स्थितीमध्ये असलेल्या हिंदू महिलांचे रक्षण केवळ भगवान श्रीकृष्णच करू शकणे : द्रौपदीप्रमाणे संपूर्ण शरणागतभावाच्या स्थितीत असलेल्या हिंदू महिलांच्या रक्षणासाठी, त्यांना संकटातून मुक्त करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण येत आहे, असे दाखवले आहे.

कलियुगांतर्गत ६ व्या कलियुगाकडून सत्ययुगाकडे होणारे संक्रमण : कर्माला ज्ञानाची, ज्ञानाला भक्तीची आणि भक्तीला गुरुकृपेची जोड मिळणे, म्हणजे कलियुगाकडून द्वापरयुगाकडे, द्वापरयुगाकडून त्रेतायुगाकडे आणि त्रेतायुगाकडून सत्ययुगाकडे साधकाचे संक्रमण होणे होय.

एका बालकाने पांडुरंगाच्या मूर्तीवर छत्री धरणे ! : चित्रात ‘हिंदु विधिज्ञ परिषदे’ला बालकरूपात रेखाटले असून तो बालक विठ्ठलाचे (पांडुरंगाचे) काँग्रेस शासनाचा भ्रष्टाचाररूपी मुसळधार पावसापासून भक्तीच्या छत्रीने रक्षण करत आहे.


1396803048_Umakka_1_lekh5_Icon१. श्रीकृष्णासमवेत केलेल्या दैनंदिन कृती दर्शवणारी भावपूर्ण चित्रे

ईश्वर किंवा गुरु यांच्या अस्तित्वाची कोणत्याही स्वरूपातील जाणीव उत्कटतेने असणे, त्या जाणिवेच्या पोटी श्रीकृष्णासमवेत केलेल्या जीवनातील दैनंदिन कृती.

1397062426_Umakka_1_lekh3_125२. साधनेतील प्रयत्नांमधून श्रीकृष्णाने दिलेल्या अनुभूती दर्शवणारी चित्रे

स्थुलातून श्रीकृष्ण जरी काहीही करतांना दिसत नसला, तरी सूक्ष्मातून प्रत्येकात वास करून तोच सर्व कर्म करत आहे.

1397119543_Umakka_2_lekh2_125३. भगवान श्रीकृष्णाची शिकवण दर्शवणारी चित्रे

ईश्वर भक्तांसाठी सूक्ष्मातीसूक्ष्म अशा निर्गुण स्वरूपातून मंत्रमुग्ध करणार्‍या आणि सहज ओळखू शकणार्‍या सगुण रूपात अवतीर्ण होणे.

1397124860_Umakka_2_lekh4_125४. ईश्वराचे समष्टी कार्य दर्शवणारी चित्रे

न मे भक्तः प्रणश्यति ।’ म्हणजे ‘माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही.’या वचना प्रमाणे ईश्वर विविध माध्यमातून भक्तांचे रक्षण करणे.

1397211199_Umakka_2_lekh6_125५. कोणतीही सेवा श्रीकृष्णाच्या कृपेने होत असल्याच्या अनुभूती दर्शवणारी चित्रे

संगणकावर सेवा करतांना, चित्र काढतांना, प्रसार करतांना, अनोळखी व्यक्तींना सामोरे जातांना, प्रवचन करतांना श्रीकृष्णाच्या कृपेने होत असणे.

1397237243_Umakka_2_lekh15_125६. सनातनमधील काही आनंददायक घटना दर्शवणारी चित्रे

सनातनच्या साधकांना दैवी कण आढळणे, साधकांना संत बनवणे यांसारख्या दिव्य उपहारांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण साधकांवर कृपेचा वर्षाव करणे.

1397240169_Umakka_2_lekh13_125७. प.पू. डॉक्टरांच्या संदर्भातील अनुभूती दर्शवणारी चित्रे

प.पू. डॉक्टरांच्या संदर्भात उमगलेले अवतार-रहस्य आणि श्रीकृष्णाप्रमाणे मधुराधिपती, जगन्माता, जगत्पिता असणार्‍या प.पू. डॉक्टरांची मधुर आठवण.

1418566858_P_Yoyatai_icon2८. पू. (सौ.) योया वाले यांनी रेखाटलेली श्रीकृष्णाच्या अस्तित्वाची अनुभूती देणारी भावचित्रे

भगवान श्रीकृष्णाप्रती असलेल्या अत्युच्च भावामुळे पू. (सौ.) योया वाले यांना विविध भावचित्रे स्फुरली आहेत.