५. कोणतीही सेवा श्रीकृष्णाच्या कृपेने होत असल्याच्या अनुभूती दर्शवणारी चित्रे

संगणकाशी खेळतांनाचे (संगणकावर सेवा करतांनाचे) चित्र : आम्ही श्रीकृष्णाची बालके आहोत आणि त्याच्या मांडीवर बसून संगणकासमवेत खेळत आहोत. आम्हाला काहीही ठाऊक नसतांना श्रीकृष्णच आमच्याकडून संगणकावर काहीतरी करून घेत आहे.

अडचणीला किंवा कठीण प्रसंगाला किंवा अनोळखी व्यक्तींना सामोरे जातांना किंवा प्रवचन करतांना श्रीकृष्णाच्या शेल्याच्या मागे लपून आश्रय घेणे : या चित्रात श्रीकृष्णाच्या शेल्याचे टोक साधिकेने हट्टाने खाली भूमीपर्यंत खेचून घेतल्याप्रमाणे असणे आणि यातूनच तिची श्रीकृष्णाशी जवळीक स्पष्ट होणे.

एका मंदिरातील विश्वस्ताने आम्हाला बाहेर काढल्यावर, आम्हाला रडतांना पाहून श्रीकृष्णाच्या हृदयाला पाझर फुटला त्याने त्वरित आम्हाला कवेत घेऊन दुसर्‍या घरात नेऊन श्रीकृष्णानेच प्रसार करून १०० डॉलर्सचे इंग्रजी ग्रंथ आणि पंचांग घेण्यास त्या व्यक्तीला भाग पाडले.

बालकभावातील चित्र काढतांनाच्या चित्रीकरणाच्या वेळी उपनेत्र (चष्मा) घातले नसल्याने स्पष्ट न दिसताही, तसेच चित्राविषयी कोणतीच मूर्त कल्पना मनात नसतांनाही श्रीकृष्णाने उंच उचलल्याचे चित्र शांतपणे साकारले जाणे

‘स्वतःला चित्रकलेचे ज्ञान नाही आणि स्वतः काहीही करू शकत नाही’, याची आंतरिक तीव्र जाणीव अन् ‘भगवंताची कलाकृती किती सुंदर अन् अपूर्व आहे’, हा कौतुकाचा भाव एकाच वेळी साधिकेच्या अंतःकरणात जागृत असल्याने मनात आश्चर्याचे भावतरंग उमटून मनदर्पण नेत्रांद्वारे आश्चर्य व्यक्त झाले आहे.

प्रत्यक्ष श्रीकृष्ण चित्र काढून घेण्यासाठी पुढ्यात उभा आहे, असे चित्र : कृष्णा, मला तुझे चित्र काढायचे असल्याने कृपया माझ्यासाठी तू उभा रहा, केवळ अध्र्या घंट्यासाठी…, अशी साधिकेने श्रीकृष्णाला विनंती केली.

श्रीकृष्ण नेतृत्व करत असलेल्या धर्मयुद्धात साधिका सहभागी झाले आहे आणि रथात अर्जुनाच्या ठिकाणी नमस्काराच्या मुद्रेत सर्व साधक उभे आहेत. साधिका श्रीकृष्णाच्या शेजारी उभी राहून त्याचा घाम पुसण्याची सेवा करत आहे.

क्षात्रभाव जागृत होऊन हातात तलवार घेणे : ईश्वराप्रती आपला बालकभाव, गोपीभाव किंवा राधाभाव यांपैकी कोणताही भाव असला, तरी त्यासमवेत काळानुसार क्षात्रभावही आवश्यक आहे. त्यामुळे या चित्रात श्रीकृष्ण मला तलवार देऊन ती कशी चालवायची, हेही चिकाटीने शिकवत आहे.


1396803048_Umakka_1_lekh5_Icon१. श्रीकृष्णासमवेत केलेल्या दैनंदिन कृती दर्शवणारी भावपूर्ण चित्रे

ईश्वर किंवा गुरु यांच्या अस्तित्वाची कोणत्याही स्वरूपातील जाणीव उत्कटतेने असणे, त्या जाणिवेच्या पोटी श्रीकृष्णासमवेत केलेल्या जीवनातील दैनंदिन कृती.

1397062426_Umakka_1_lekh3_125२. साधनेतील प्रयत्नांमधून श्रीकृष्णाने दिलेल्या अनुभूती दर्शवणारी चित्रे

स्थुलातून श्रीकृष्ण जरी काहीही करतांना दिसत नसला, तरी सूक्ष्मातून प्रत्येकात वास करून तोच सर्व कर्म करत आहे.

1397119543_Umakka_2_lekh2_125३. भगवान श्रीकृष्णाची शिकवण दर्शवणारी चित्रे

ईश्वर भक्तांसाठी सूक्ष्मातीसूक्ष्म अशा निर्गुण स्वरूपातून मंत्रमुग्ध करणार्‍या आणि सहज ओळखू शकणार्‍या सगुण रूपात अवतीर्ण होणे.

1397124860_Umakka_2_lekh4_125४. ईश्वराचे समष्टी कार्य दर्शवणारी चित्रे

न मे भक्तः प्रणश्यति ।’ म्हणजे ‘माझ्या भक्ताचा कधीही नाश होत नाही.’या वचना प्रमाणे ईश्वर विविध माध्यमातून भक्तांचे रक्षण करणे.

1397211199_Umakka_2_lekh6_125५. कोणतीही सेवा श्रीकृष्णाच्या कृपेने होत असल्याच्या अनुभूती दर्शवणारी चित्रे

संगणकावर सेवा करतांना, चित्र काढतांना, प्रसार करतांना, अनोळखी व्यक्तींना सामोरे जातांना, प्रवचन करतांना श्रीकृष्णाच्या कृपेने होत असणे.

1397237243_Umakka_2_lekh15_125६. सनातनमधील काही आनंददायक घटना दर्शवणारी चित्रे

सनातनच्या साधकांना दैवी कण आढळणे, साधकांना संत बनवणे यांसारख्या दिव्य उपहारांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण साधकांवर कृपेचा वर्षाव करणे.

1397240169_Umakka_2_lekh13_125७. प.पू. डॉक्टरांच्या संदर्भातील अनुभूती दर्शवणारी चित्रे

प.पू. डॉक्टरांच्या संदर्भात उमगलेले अवतार-रहस्य आणि श्रीकृष्णाप्रमाणे मधुराधिपती, जगन्माता, जगत्पिता असणार्‍या प.पू. डॉक्टरांची मधुर आठवण.

1418566858_P_Yoyatai_icon2८. पू. (सौ.) योया वाले यांनी रेखाटलेली श्रीकृष्णाच्या अस्तित्वाची अनुभूती देणारी भावचित्रे

भगवान श्रीकृष्णाप्रती असलेल्या अत्युच्च भावामुळे पू. (सौ.) योया वाले यांना विविध भावचित्रे स्फुरली आहेत.